एनसीसी प्रजासत्ताक दिन शिबिर 2024 चे उद्घाटन
नवी दिल्ली, 05 जानेवारी (हिं.स.) : राष्ट्रीय छात्रसेना (एनसीसी) देशातील तरुणांपुढचा आदर्श असल्याचे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले. नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिन शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी उपराष्ट्रपती म्हणाले की, एनसीसी कॅडेट्स हे भारताच्या उदयाचे महत्वाचे भागीदार असून, देशाच्या युवकांपुढील आदर्श आहेत. भारताला 2047 पर्यंत खऱ्या अर्थाने विकसित देश आणि विश्व गुरु करण्यासाठी त्यांनी उत्साह, शौर्य आणि समर्पित भावनेने काम करावे, असे आवाहन केले. “शिस्त आणि देशभक्ती हे गुण तुमच्या हृदयात सदैव वसत राहायला हवेत, हीच आपल्या मातृभूमीला सर्वात मोठी आदरांजली आहे, ते म्हणाले. एनसीसी, राष्ट्रीय जागरूकता मोहिमांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तुमचा नैसर्गिक विकास सुनिश्चित करते,” असे त्यांनी नमूद केले. एनसीसी मधील महिलांच्या वाढत्या सहभागाची प्रशंसा करत धनखड म्हणाले की, यंदाच्या प्रजासत्ताक दिनी, महिला छात्र दोन विशेष तुकड्यांमध्ये महिला बँड पथकांसह कर्तव्य पथावर अभिमानाने संचलन करतील.
हिंदुस्थान समाचार
