कोलंबो, 25 सप्टेंबर (हिं.स.)। उत्तर-पश्चिम श्रीलंकेतील एका जंगलात वसलेल्या मठामध्ये केबलद्वारे चालवली जाणारी रेल्वे उलटल्यामुळे एक भारतीय नागरिकासह सात बौद्ध भिक्षूंचा मृत्यू झाला आहे. तसेच या दुर्घटनेत ६ जण जखमी झाले असून, त्यापैकी ४ जणांची प्रकृती गंभीर आहे.
श्रीलंका पोलिसांनी गुरुवारी (दि.२५) या घटनेची माहिती दिली. ही घटना बुधवारी रात्री ना उयाना आरण्य सेनासनया मठात घडली, जो कोलंबोपासून सुमारे १२५ किलोमीटर अंतरावर निकावेरेटिया येथे स्थित आहे. हा मठ ध्यान शिबिरांसाठी प्रसिद्ध असून, जगभरातून साधक येथे येत असतात.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत ७ बौद्ध भिक्षूंपैकी एक भारतीय, एक रशियन आणि एक रोमानियन नागरिक होता.जखमींमध्ये चार जण गंभीर स्थितीत आहेत.प्राथमिक माहितीनुसार, केबल तुटल्यामुळे ही दुर्घटना झाली. त्यामुळे रेल्वेची गाडी अतिशय वेगाने खाली घसरली आणि पटरीवरून उतरून झाडाला धडक दिल्यानंतर उलटली.
केबल ऑपरेटेड ट्रेन ही एक अशी प्रणाली आहे, जिथे गाडीला स्वतःचा इंजिन नसतो.यामध्ये गाडीच्या डब्यांना लोखंडी स्टील केबलच्या मदतीने वर ओढले किंवा खाली सोडले जाते.ही प्रणाली विशेषतः डोंगराळ व उताराच्या भागांमध्ये वापरली जाते.
—————
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode
