
नागपूर, 25 सप्टेंबर, (हिं.स.)। येत्या पदवीधर निवडणुकीत भाजपा महायुतीचा झेंडा फडकेल असा ठाम विश्वास भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. नागपूर येथील गोकुळ पेठ विभागीय पदवीधर मतदार संघ निवडणूक प्रचार कार्यालयाचे त्यांच्या हस्ते आज उद् घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस माधवीताई नाईक, नागपूर महानगर अध्यक्ष दयाशंकर तिवारी, डॉ. संजय भेंडे, पदवीधर नोंदणी प्रमूख सुधाकर कोहळे ,अरुण लाखानी, अजय संचेती, डॉ.उपेंद्र कोठेकर, अनिल सोले, विष्णू चांगदे, राजीव पोतदार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—————
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर
