cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > International > भारताच्या सहकार्याने नेपाळमध्ये पेट्रोलियम पाईपलाईनच्या विस्ताराचे काम सुरु
International

भारताच्या सहकार्याने नेपाळमध्ये पेट्रोलियम पाईपलाईनच्या विस्ताराचे काम सुरु

CliQ INDIA
Last updated: August 3, 2025 6:34 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

काठमांडू, २ ऑगस्ट (हिं.स.) – भारत आणि नेपाळ यांच्यातील करारानुसार भारत सरकारच्या आर्थिक सहकार्याने नेपाळमधील पेट्रोलियम पाईपलाईनच्या दुसऱ्या टप्प्याचा विस्तार सुरु करण्यात आला आहे.

बिहार राज्यातील मोतिहारी येथून नेपाळमधील अमलेखगंजपर्यंत यापूर्वी उभारण्यात आलेल्या पाईपलाईनचा विस्तार आता चितवन जिल्ह्यातील लोथरपर्यंत केला जात आहे. भारत सरकारकडून या पाईपलाईनद्वारे इंधनाच्या सुलभ पुरवठ्यासोबतच वाहतूक खर्चातही मोठी बचत होणार आहे. या विस्तारासोबतच तीन महिन्यांच्या साठवणूक क्षमतेसह एक आधुनिक पेट्रोलियम डिपो लोथरमध्ये उभारण्यात येणार आहे.

नेपाळ ऑईल कॉर्पोरेशन (एनओसी) ने लोथर येथे प्रकल्पाच्या प्रादेशिक कार्यालयाचे उद्घाटन करत पाईपलाईन विस्ताराची औपचारिक सुरुवात केली. राप्ती नगरपालिका-१ येथील सुमारे २३ बीघा आणि १२ कट्ठा क्षेत्रावर ग्रीनफिल्ड तत्त्वावर हा टर्मिनल उभारण्यात येणार आहे.

एनओसीनुसार, भारतातील इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या (IOC) मोतिहारी डिपोमधून थेट लोथरपर्यंत इंधन पाठवले जाणार आहे. सध्या मोतिहारी ते अमलेखगंजपर्यंत पेट्रोल आणि डिझेल पुरवठा केला जात आहे. विस्ताराच्या दुसऱ्या टप्प्यात अमलेखगंज ते लोथर या ६२ किमी अंतरावर १०.७५ इंच व्यासाच्या पाईपलाईनचे काम शनिवारी सुरू करण्यात आले.

या प्रकल्पाचे प्रमुख अभियंता प्रदीप कुमार यादव यांनी सांगितले की, सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून आजपासून प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आहे. हा प्रकल्प तीन वर्षांच्या आत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यांनी सांगितले की, ही पाईपलाईन पर्यावरणीय परिणाम कमी करेल, इंधन चोरी रोखेल आणि भेसळ टाळेल. स्थानिक समन्वयातून रोजगार व इतर संधी देखील निर्माण होतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

सहायक प्रबंधक अनुपम पराजुली यांनी सांगितले की, ही पाईपलाईन दरतास २७३ किलोलीटर पेट्रोलियम पुरवठा करू शकेल. ही पाईपलाईन पूर्व–पश्चिम महामार्गाच्या समांतर चालणार असून दरवर्षी सुमारे २० लाख टन इंधन वाहतूक करण्याची क्षमता असेल.

या प्रकल्पात लोथरमध्ये १६० चौरस मीटर क्षेत्रावर एक पाईपलाईन स्टेशन देखील उभारले जात आहे. याशिवाय, पेट्रोलसाठी ११,००० किलोलीटर क्षमतेचे तीन उभे टँक, डिझेलसाठी १५,५०० किलोलीटर एकत्रित क्षमतेचे तीन टँक आणि केरोसीनसाठी ८०० किलोलीटर क्षमतेचे दोन टँक उभारण्याचे काम सुरू आहे.

—————

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर

You Might Also Like

अमेरिकेत डेमोक्रॅटिक खासदार इल्हान ओमर यांच्यावर हल्ला, हल्लेखोराला अटक
बलुचिस्तानमध्ये पाकिस्तान सुरक्षा दलांचे 86 जवान ठार; बीएलएने घेतली जबाबदारी
ईराणने ताब्यात घेतले इस्त्रायली मालवाहू जहाज
पाकिस्तानमध्ये रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट, जाफर एक्सप्रेसचे 6 डबे रुळावरून घसरले | BulletsIn
भारत-सौदी अरेबियात वीज, हरित/स्वच्छ हायड्रोजन विषयक सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article सेवामार्गाच्या बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागातर्फे सातत्यपूर्ण बहुविध उपक्रम
Next Article वाराणसी : पंतप्रधानांच्या हस्ते किसान सन्मान निधीचा २० वा हप्ता जारी
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?