cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > International > भारत-सौदी अरेबियात वीज, हरित/स्वच्छ हायड्रोजन विषयक सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या
International

भारत-सौदी अरेबियात वीज, हरित/स्वच्छ हायड्रोजन विषयक सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

CliQ INDIA
Last updated: October 9, 2023 12:52 pm
CliQ INDIA
Share
4 Min Read
SHARE

भारताच्या ऊर्जा संक्रमणाला गती देण्यासाठी हरित हायड्रोजन हा आश्वासक पर्याय : मंत्री आर.के. सिंह

रियाध, 9 ऑक्टोबर : भारत आणि सौदी अरेबियाने रविवारी रियाध येथे वीज आंतरजोडणी, हरित/स्वच्छ हायड्रोजन आणि पुरवठा साखळी या क्षेत्रांमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या सामंजस्य करारावर सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असलेले आलेले ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर.के. सिंह आणि सौदी अरेबियाचे ऊर्जा मंत्री अब्दुलअजीज बिन सलमान अल-सौद यांनी रियाधमध्ये मध्य पूर्व उत्तर आफ्रिका हवामान सप्ताह (MENA ) च्या निमित्ताने सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

Contents
भारताच्या ऊर्जा संक्रमणाला गती देण्यासाठी हरित हायड्रोजन हा आश्वासक पर्याय : मंत्री आर.के. सिंहग्लोबल स्टॉकटेक ऑफ पॅरिस ऍग्रीमेंट

वीज आंतरजोडणी क्षेत्रात दोन्ही देशांमधील सहकार्यासाठी एक आराखडा तयार करणे आहे; मागणी अधिक असताना आणि आपत्कालीन परिस्थितीत विजेची देवाणघेवाण; प्रकल्पांचा सह-विकास; हरित/स्वच्छ हायड्रोजन आणि नवीकरणीय ऊर्जेची सह-निर्मिती ; आणि हरित/स्वच्छ हायड्रोजन आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात वापरल्या जाणार्या सामग्रीची सुरक्षित, विश्वासार्ह आणि लवचिक पुरवठा साखळी स्थापित करणे हा या सामंजस्य कराराचा उद्देश आहे.

ऊर्जा क्षेत्रातील सहकार्याच्या वर-उल्लेखित क्षेत्रांमध्ये संपूर्ण पुरवठा आणि मूल्य साखळी प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान B2B उद्योग परिषदा आणि नियमित B2B परस्परसंवाद आयोजित केले जातील असा निर्णयही दोन्ही ऊर्जा मंत्र्यांनी घेतला.

तत्पूर्वी, केंद्रीय ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर.के. सिंह यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळाने 8 ते 12 ऑक्टोबर 2023 दरम्यान सौदी अरेबियामधील रियाध येथे आयोजित मध्य पूर्व उत्तर आफ्रिका हवामान सप्ताह 2023 च्या उच्च-स्तरीय सत्रात भाग घेतला. आज रियाधमध्ये मध्य पूर्व उत्तर आफ्रिका हवामान सप्ताहाच्या पहिल्या दिवशी पॅरिस कराराचे जागतिक हितधारक प्रादेशिक संवाद: महत्वाकांक्षा आणि न्याय्य आणि सर्वसमावेशक संक्रमण सक्षम करणारे तंत्रज्ञान” यावरील सत्राला संबोधित करताना केंद्रीय ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री म्हणाले की जागतिक स्तरावर ऊर्जा उत्पादन, वापर आणि शाश्वत भविष्य घडविण्यासाठी संधीचा शोध घेणे आणि सामायिक करणे यासाठी हा हवामान सप्ताह अत्यंत महत्त्वाचा आहे.

त्यांनी जागतिक समुदायाला सांगितले की, भारत आज ऊर्जा क्षेत्रामध्ये जगातील सर्वात महत्वाच्या देशांपैकी एक आहे आणि ऊर्जा संक्रमणामध्ये एक नेतृत्व म्हणून उदयास आला आहे. जगातील लोकसंख्येच्या जवळपास 17% लोकसंख्या असलेला आणि जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला भारत, 2030 पर्यंत उत्सर्जन तीव्रता त्याच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या 45% नी कमी करण्यासाठी आणि 2070 पर्यंत नेट झिरो उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलत आहे. भारताच्या ऊर्जा क्षेत्रात उल्लेखनीय परिवर्तन घडले आहे, ज्याचा उद्देश जनतेला विश्वासार्ह, परवडणारी आणि शाश्वत ऊर्जा प्रदान करणे हा आहे याची त्यांनी आठवण करून दिली .

सिंह म्हणाले की, भारताच्या ऊर्जा संक्रमणाला गती देण्यासाठी हरित हायड्रोजन हा एक आश्वासक पर्याय आहे. तुम्हाला हे सांगताना मला खूप आनंद होत आहे की भारत सरकारने हायड्रोजन उर्जेचा वापर करण्यासाठी राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन सुरू केले आहे आणि या मिशनसाठी 2.3 अब्ज डॉलर्सच्या प्रारंभिक खर्चास मान्यता दिली आहे.

आघाडीच्या पूर्ण क्षमतेने वापर करण्यासाठी शाश्वत जैवइंधनामध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्यासाठी मध्य पूर्व उत्तर आफ्रिका देशांनी जागतिक जैव इंधन आघाडीत सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. मध्य पूर्व उत्तर आफ्रिका हवामान सप्ताहचा उद्घाटन सोहळा येथे पाहता येईल.

ग्लोबल स्टॉकटेक ऑफ पॅरिस ऍग्रीमेंट

मध्य-पूर्व आणि उत्तर आफ्रिका हवामान सप्ताहातील उच्च-स्तरीय GST (ग्लोबल स्टॉकटेक ऑफ द पॅरिस करार) प्रादेशिक संवाद या प्रदेशातील प्रमुख संदेशांवर चर्चा करण्यासाठी धोरण निर्माते, प्रमुख भागधारक आणि आंतरसरकारी प्रक्रियेतील भागीदारांना फलनिष्पत्ती बाबत सहमतीसाठी एकत्र आणेल. MENA च्या संदर्भात हवामान कृती आणि मदत वाढविण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढविण्यासाठी आव्हाने, अडथळे, उपाय आणि संधी यावर चर्चा करण्यासाठी हा संवाद एक व्यासपीठ म्हणून काम करेल.

You Might Also Like

आयआरजीसी संबंधीत व्यक्तींना फिफा वर्ल्ड कपमध्ये प्रवेश नाही, ट्रम्प प्रशासनाचा इराणला इशारा
नेपाळ निवडणुका: बालेन शाह यांच्या आरएसपीचा १२४ जागांवर दणदणीत विजय, दोन-तृतीयांश बहुमताकडे.
चिलीत आगीचे रौद्ररूप : ११२ बळी, १६०० बेघर, २०० बेपत्ता
इराणी शाळेवरील हल्ल्यामागे अमेरिकन सैन्य असण्याची शक्यता: यूएस चौकशीत उघड
बीएलएच्या अत्याधुनिक शस्त्रांचा सामना करण्यास पाक सैन्य असक्षम – ख्वाजा आसिफ

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article ‘दाभोलकर-पानसरे हत्या : तपासातील रहस्ये?’ पुस्तकातून वाचा फोडण्याचा प्रयत्न ! – डॉ. भागवत कराड
Next Article सिक्कीम स्थितीबाबत केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा आणि मुख्यमंत्री तमांग यांची उच्चस्तरीय बैठक
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?