cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > International > पाकिस्तानात शहबाज शरीफांवर विरोधकांचा हल्लाबोल
International

पाकिस्तानात शहबाज शरीफांवर विरोधकांचा हल्लाबोल

CliQ INDIA
Last updated: January 24, 2026 6:34 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

इस्लामाबाद, 23 जानेवारी (हिं.स.)।अमेरिकेशी अतिशय जवळीक साधण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ आता आपल्या देशातच प्रश्नांच्या गराड्यात सापडले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या ‘शांती बोर्डा’मध्ये सहभागी होण्यासाठी शहबाज शरीफ यांनी गुरुवारी स्वाक्षरी केली. त्यांच्या या निर्णयावर विरोधकांकडून तीव्र टीका केली जात आहे.पाकिस्तानसह १९ देशांच्या नेत्यांनी दावोस येथे या समूहाच्या सनदेला आपली नावे नोंदवली. या वेळी स्वाक्षरी करताना शहबाज शरीफ ट्रम्प यांच्या शेजारी बसलेले आणि हसताना दिसले. मात्र, या निर्णयामुळे पाकिस्तानमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे.

या निर्णयावर विरोधी पक्ष ‘पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ’ (पीटीआय)चे अध्यक्ष गोहर अली खान यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी कोणताही सल्लामसलत न करता शांती बोर्डात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. ते म्हणाले, “काल परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की पाकिस्तान शांती बोर्डात सामील झाला आहे. सरकारने संसदेला पूर्णपणे दुर्लक्षित केले आहे.”

गोहर अली खान यांनी ठामपणे सांगितले की शांती बोर्डात सहभागी होण्यापूर्वी त्याच्या अटी व शर्ती संसदेसमोर मांडायला हव्या होत्या. त्यांनी प्रश्न उपस्थित केला, “तुम्ही हमासचे निशस्त्रीकरण करण्यामध्ये भूमिका बजावणार आहात का? जर ही संयुक्त राष्ट्रांची (यूएन) कोणती संस्था असती, तर सरकार स्वतःहून निर्णय घेऊ शकले असते. मात्र शांती बोर्ड हा यूएनचा भाग नाही.”

दरम्यान, पाकिस्तानमधील मीडिया माहितीनुसार, पीटीआयचे वरिष्ठ नेते असद कैसर यांनीही या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “इतक्या संवेदनशील मुद्द्यावर सरकारने सर्वपक्षीय सहमती साधण्याचा प्रयत्नही केला नाही, हे दुर्दैवी आहे. या विषयावर संसदेत चर्चा झाली पाहिजे होती, जेणेकरून जागतिक समुदायासमोर पाकिस्तानमध्ये लोकशाही अस्तित्वात आहे, असा संदेश गेला असता.”

शांती बोर्ड स्थापन करण्याची कल्पना गाझा युद्धाच्या काळात प्रथम पुढे आली, जेव्हा अमेरिकेने आपली शांतता योजना मांडली होती. सुरुवातीला हा बोर्ड गाझामधील शांततेवर देखरेख ठेवण्यासाठी तयार करण्यात आला होता. मात्र, आता तो आंतरराष्ट्रीय संघर्षांच्या समाधानासाठी मध्यस्थाची भूमिका बजावण्याच्या दिशेने पुढे जात असल्याचे दिसत आहे. ट्रम्प या माध्यमातून स्वतःचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा (UNSC) पर्याय उभा करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही सांगितले जात आहे.

—————

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode

You Might Also Like

बलुचिस्तानमध्ये १६ नोव्हेंबरपर्यंत इंटरनेट बंदी लागू
गुजरातमध्ये अदानी सीएनजीच्या दरात वाढ; वाढत्या इंधन दरांमुळे ऑटोचालक संकटात, आंदोलने सुरू
इस्रायलसोबत १० दिवसांच्या युद्धविरामानंतर लेबनानमध्ये हजारो कुटुंबांचा परतीचा प्रवास सुरू
इस्त्रायलमधील भारतीयांसाठी ऍडव्हायझरी जारी | BulletsIn
अमेरिकेचा कॅरिबियन समुद्रात संशयित पाणबुडीवर हल्ला

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article धर्माबाद नगर परिषदेत विषय समिती व सभापती पदांची बिनविरोध निवड
Next Article ‘जनगणना 2027’ अंतर्गत पहिल्या टप्प्यातील गृहगणना व घरयादी कामकाजाचे वेळापत्रक आणि प्रश्नावली जाहीर
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?