cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > International > इराणमध्ये खामेनीविरोधी आंदोलन तीव्र; सात जणांचा मृत्यू
International

इराणमध्ये खामेनीविरोधी आंदोलन तीव्र; सात जणांचा मृत्यू

CliQ INDIA
Last updated: January 3, 2026 6:34 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

तेहरान, 02 जानेवारी (हिं.स.)।इराणची ढासळलेली अर्थव्यवस्था यामुळे सुरू झालेले विरोध आंदोलन आता ग्रामीण भागातही पसरले आहे. या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात किमान ७ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पाच जणांचा मृत्यू गुरुवारी, तर एका व्यक्तीचा मृत्यू बुधवारी झाला होता. या चकमकींमध्ये इराणच्या अर्धसैनिक दलातील (पॅरामिलिटरी फोर्सेस) एका जवानाचाही मृत्यू झाला असून १३ हून अधिक जण जखमी झाले आहेत.

हिंसक आंदोलनादरम्यान झालेल्या मृत्यूंनंतर आंदोलक अधिकच नियंत्रणाबाहेर होत असल्याचे चित्र आहे. तेहरानमधून सुरू झालेले हे आंदोलन आता इराणमधील ५० पेक्षा अधिक शहरांपर्यंत पोहोचले आहे. वाढती महागाई हा या आंदोलनाचा मुख्य मुद्दा असून, सुरक्षादलांच्या कारवाईनंतर आंदोलनाला आणखी तीव्र स्वरूप आले आहे.

सर्वाधिक हिंसक चकमकी तेहरानच्या दक्षिण-पश्चिमेला सुमारे ३०० किलोमीटर अंतरावर असलेल्या अजना शहरात झाल्या आहेत. हे शहर इराणच्या लोरेस्तान प्रांतात येते. याचप्रमाणे लोर्देगान शहरातही सुरक्षादल आणि सशस्त्र आंदोलकांमध्ये तीव्र संघर्ष झाला आहे. अहवालांनुसार आंदोलकांनी राज्यपालांच्या कार्यालयाला आग लावली आहे. काही शहरांमध्ये इराण रिव्होल्युशनरी गार्डच्या इमारतींवर आंदोलकांनी ताबा मिळवला असल्याचेही वृत्त आहे. तसेच न्यायालयांच्या इमारतींमध्येही आंदोलकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

इराणच्या सरकारी माध्यमांनी ६ जणांना अटक करण्यात आल्याचे सांगितले असले, तरी या अटकांची कारणे स्पष्ट करण्यात आलेली नाहीत. आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या माहितीनुसार, वेगवेगळ्या शहरांमध्ये एकूण २० जणांना अटक करण्यात आली आहे. इराणमधील या आंदोलनांची सुरुवात राजधानी तेहरानमधून झाली होती. सर्वप्रथम तेहरानमधील व्यापाऱ्यांनी व्यवसायाची स्थिती बिघडत चालल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढला. त्यानंतर या आंदोलनात तेहरान विद्यापीठातील विद्यार्थीही सहभागी झाले. पुढे हा असंतोष इतर शहरांमध्ये पसरला आणि सध्या संपूर्ण इराणमध्ये आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत.

—————

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode

You Might Also Like

इराणने पाकिस्तानी जहाजाला होर्मुझ पार करण्यापासून रोखले
यूएस स्मरणार्थ पासपोर्टवर डोनाल्ड ट्रम्पचे चित्र: राष्ट्रीय राजकीय आणि संविधानिक चर्चा
पश्चिम आशिया तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा सौदी अरेबियाला ठाम पाठिंबा
इराकमध्ये वसतिगृहाला लागलेल्या आगीत १४ विद्यार्थ्यांचा मृत्यू, १८ जखमी
ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान संघर्ष थांबवल्याच्या दाव्याचा पुनरुच्चार केला, म्हणाले की 200% आयात शुल्काच्या धमकीमुळे युद्धविराम करण्यास भाग पाडले.

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article पालकमंत्र्याअभावी रायगडचा विकास रखडला – Hindusthan Samachar Marathi
Next Article भारत आत्मरक्षणासाठी कोणाचीही परवानगी घेणार नाही : एस. जयशंकर
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?