नवी दिल्ली, ९ डिसेंबर, (हिं.स) इराकच्या उत्तरेकडील शहर इरबिल येथे विद्यापीठाच्या वसतिगृहाला लागलेल्या आगीत १४ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर १८ जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
इराकचे पंतप्रधान मसरूर बरजानी यांनी घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. तसेच या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश त्यांनी दिले आहेत.
हिंदुस्थान समाचार
