cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > International > इराणमधील अनेक शहरांमध्ये हिंसक निदर्शने सुरूच; आतापर्यंत २००० लोकांचा मृत्यू
International

इराणमधील अनेक शहरांमध्ये हिंसक निदर्शने सुरूच; आतापर्यंत २००० लोकांचा मृत्यू

CliQ INDIA
Last updated: January 14, 2026 6:34 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

तेहरान, 13 जानेवारी (हिं.स.)।इराणमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या देशव्यापी आंदोलनांदरम्यान आतापर्यंत २,००० लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये आंदोलकांसह सुरक्षा दलांचे जवानही समाविष्ट आहेत, अशी माहिती एका इराणी अधिकाऱ्याने मंगळवारी दिली. इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या मृत्यूंची संख्या इराणी अधिकाऱ्यांनी पहिल्यांदाच सार्वजनिकरीत्या मान्य केली आहे.

माध्यमांच्या वृत्तानुसार, संबंधित अधिकाऱ्याने दावा केला आहे की या मृत्यूंसाठी तथाकथित दहशतवादी घटक जबाबदार आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या घटनांमध्ये आंदोलकांसोबतच सुरक्षा कर्मचाऱ्यांचाही जीव गेला आहे. मात्र मृतांपैकी नेमके किती आंदोलक आणि किती सुरक्षा दलातील कर्मचारी होते, याचा तपशील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेला नाही.

अलिकडील ही अस्थिरता खराब आर्थिक परिस्थितीमुळे निर्माण झाली असून, गेल्या तीन वर्षांतील इराणी सरकारसमोरील ही सर्वात मोठी अंतर्गत आव्हान मानली जात आहे. हे आंदोलन अशा काळात सुरू आहे, जेव्हा गेल्या वर्षभरात इस्रायल आणि अमेरिकेकडून झालेल्या कारवायांनंतर इराणवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढलेला आहे.

१९७९ च्या इस्लामी क्रांतीनंतर सत्तेत असलेल्या सरकारने या आंदोलनांबाबत दुहेरी धोरण स्वीकारल्याचे दिसून येते. एका बाजूला सरकार आर्थिक अडचणींमुळे झालेली आंदोलने योग्य असल्याचे मान्य करत आहे, तर दुसऱ्या बाजूला आंदोलकांविरुद्ध कठोर कारवाईही करत आहे. सरकारने या अस्थिरतेसाठी अमेरिका आणि इस्रायल यांना जबाबदार धरले आहे.

इराणी सरकारचे म्हणणे आहे की, ज्या लोकांना ते “दहशतवादी” मानते, त्यांच्याच ताब्यात आता या आंदोलनांचे नियंत्रण आहे. याआधी एका मानवाधिकार संघटनेने शेकडो मृत्यूंची पुष्टी करत हजारो लोकांना अटक करण्यात आल्याचा दावा केला होता.

अलीकडच्या काळात इंटरनेट बंदीसारख्या संचार निर्बंधांमुळे माहितीची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणावर अडथळलेली आहे. गेल्या एका आठवड्यात रात्रीच्या वेळी आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या संघर्षांचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. यापैकी काही व्हिडिओंची माध्यमांनी पुष्टी केली आहे. या व्हिडिओंमध्ये गोळीबार, जळती वाहने आणि इमारती स्पष्टपणे दिसत आहेत.

—————

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode

You Might Also Like

इराणची 158 नौसैनिक जहाजे नष्ट केली – ट्रम्प यांचा दावा
इस्रायलसोबत १० दिवसांच्या युद्धविरामानंतर लेबनानमध्ये हजारो कुटुंबांचा परतीचा प्रवास सुरू
चीनमध्ये बांधकाम सुरू असलेला पूल कोसळला; १२ कामगारांचा मृत्यू
इराण संघर्षाच्या वाढत्या चिंतेत अमेरिकेची पश्चिम आशियात युद्धनौका तैनाती
ईशा गुप्ताने अमेरिका-इराण संघर्ष वाढल्याच्या पार्श्वभूमीवर अबू धाबीमध्ये सुरक्षित असल्याची पुष्टी केली, परिस्थिती भीतीदायक असल्याचे म्हटले आणि लवकरच भारतात परतण्याची आशा व्यक्त केली.

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article पिपंरी -संकल्प शाश्वत विकासाचा घोषवाक्यासह भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध
Next Article कुत्रे चावल्यास राज्य सरकार मोबदला देईल- सुप्रीम कोर्ट
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?