मुंबई, 28 नोव्हेंबर (हिं.स.) : झी मराठी वरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ह्या मालिकेचा प्रेक्षकांमध्ये बराच बोलबोला सुरु आहे. प्रत्येक सप्ताहात हि मालिका काहींना काही नवीन वळण घेत असते. या मालिकेत भुवनेश्वरी आणि अक्षराचे नाते टप्या टप्यावर नवीन ट्विस्ट घेऊन येत आहे. त्याच कारण अक्षराच्या शाळेचा विषय असो किंवा अधिपतीचा अभ्यास. नुकतंच ‘सारं काही तिच्यासाठी’ आणि ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ह्या दोन मालिकांचे महासंगम विशेष भाग पार पडले. त्यात भुवनेश्वरी कोकणात अधिपतीला जमिनीच्या व्यवहारसाठी पाठवते पण भुवनेश्वरीला हे माहिती नाही की हा व्यवहार तिला एका मोठ्या संकटात टाकणार आहे. अक्षराची भेट रघुनाथरावांशी होते आणि रघुनाथकाकांच्या मदतीने ती चारुहाससरांवर म्हणजेच अधिपतीच्या वडिलांवर आयुर्वेदिक औषधी उपचार सुरु करते आणि तेही भुवनेश्वरी मॅडमच्या नकळत. चारुहाससरांवर उपचार सुरु असताना अक्षराला एक मोठ गुपित कळतं आणि अक्षरा त्याचा शोध घेण्याचं ठरवते. अक्षराच्या आयुष्यात एकीकडे भुवनेश्वरी पासून लपवून अधिपतीची शिकवणी घेणे आणि दुसरीकडे चारुहाससरांवर कोण व्यक्ती आहे जी चुकीचा उपचार करत होते ह्या गोष्टीचा शोध घेणे ह्या दोन गोष्टीचा ध्यास आहे.
हिंदुस्थान समाचार
