मुंबई, 20 ऑक्टोबर : दुरावलेल्या नात्यांना पुन्हा जवळ आणण्यासाठी उमाने उचललेले पाऊल म्हणजे सारं काही तिच्यासाठी. ह्या मालिकेत रोज नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. मग ते ओवी आणि श्रीनिवास मधली नोकझोक असूदे किंवा निशी आणि ओवी मध्ये बहिणींचं खुलणारं नातं असुदे, ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचं दिसून येत आहे.
आता ह्या मालिकेत आणखी एक मोठा खुलासा होणार आहे. आठवड्यच्या येत्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल ओवीने सांगितल्यावर निशीला मान्य नाही की उमाला नृत्य कला येते आणि ती खूप छान नृत्य करते. निशीला ही गोष्ट पटावी आणि उमाने लपवलेली ही कला निशीला कळावी ह्यासाठी ओवी निशीसोबत पैज लावते. पैज लावल्याप्रमाणे ओवी उमाला दिसेल अश्या जागेवर तिचे आवडते घुंगरू ठेवते. ओवीचा हा सगळा प्लॅन यशस्वी ठरतो आणि उमा ते घुंगरू घालून सुंदर गाण्यावर मंत्रमुग्ध होऊन नृत्य करते. त्याचवेळेस रघुनाथ घरी येतात. आता वीस वर्षानंतर उमाला मिळालेला आनंदाचा क्षण उमाचा घात करेल का ? उमाची नृत्यकला पाहिल्यावर काय करतील रघुनाथ खोत ?
