मुंबई, 17 ऑक्टोबर : नवरात्रीचा उत्सव सुरु झाला असून देशभरात हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. झी मराठीवरील मालिकांमध्ये प्रमुख भूमिका निभावणाऱ्या अभिनेत्रींनी ह्या नवरात्रोत्सवाबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘अप्पी आमची कलेक्टर’ ह्या मालिकेत अप्पी (शिवानी नाईक) म्हणाली, की नवरात्री हा माझ्यासाठी खूप महत्वाचा सण आहे. कारण ह्या नऊ दिवसात प्रसन्न आणि छान वातावरण असते. देवी मधली शांतता, आत्माविश्वास, तिच्या डोळ्यातील तेज मन प्रसन्न करत. देवीची नऊ रूपं आपल्यावर कुठल्या न कुठल्या प्रकारे प्रभाव पाडतात . ह्या वर्षी मी शूट करत असेन पण मी नक्की देवीचे दर्शन व आशिर्वाद नक्कीच घेईन आणि तिचे मनापासून आभार मानेन. सगळ्या प्रेक्षकांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.
‘सारं काही तिच्यासाठी’ ह्या मालिकेतून उमा (खुशबू तावडे) हिने देवीच्या स्वागतासाठी काय तयारी केली आहे हे उत्साहाने सांगताना म्हणाली, नवरात्री साजरी करण्यासाठी मी खूप आतुर आहे. मला असे वाटते देवीं मधली जी शांतता, संयम व निर्मळपणा तो मी जोपासला आहे. आयुष्यात संयम व शांत स्वभाव असावा कारण त्यामूळे खूप मदत होते. देवीवर विश्वास ठेवून मेहेनत करत राहावं असे माझे मत आहे. मी आमच्या मालिकेच्या सेटवरच कलाकारांसोबत हा उत्सव थाटात साजरा करणार आहे. ह्या वर्षी माझा मुलगा २ वर्षांचा झाला आहे. त्याला वेगवेगळ्या सणांना बद्दल माहिती झाली आहे, म्हणून मी त्याला गरबा दांडिया खेळायला घेऊन जाईन. ह्या सुंदर उत्सवासाठी सगळ्या भाविकांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.
