cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Entertainment > ‘वीर सावरकर, सिक्रेट फाइल्स’ वेबसीरिजच्या चित्रीकरणास प्रारंभ
Entertainment

‘वीर सावरकर, सिक्रेट फाइल्स’ वेबसीरिजच्या चित्रीकरणास प्रारंभ

CliQ INDIA
Last updated: October 21, 2023 1:38 pm
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE

मुंबई, 20 ऑक्टोबर : ‘वीर सावरकर, सिक्रेट फाइल्स’ या हिंदी भाषेतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावरील पहिल्या वेबसीरिजच्या चित्रीकरणाचा प्रारंभ भोर येथील राजवाड्यात घटस्थापनेच्या मुहूर्तावर करण्यात आला.यावेळी या वेब सीरिजचे लेखक दिग्दर्शक योगेश सोमण, निर्माते आणि डेक्कन ग्रुपचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ. अनिर्बान सरकार, डेक्कन ए व्ही मीडियाचे संचालक अजय कांबळे, प्रॉडक्शन हेड साची गाढवे, सिनेमॅटोग्राफर प्रसाद भेंडे, प्रोडक्शन डिझायनर, सिद्धार्थ तातूसकर,कला दिग्दर्शक महेश कोरे आदी उपस्थित होते.

दिग्दर्शक योगेश सोमण म्हणाले, सावरकरांनी आपले संपूर्ण आयुष्य कुटुंबासहित देशकार्यासाठी अर्पण केले. त्यामुळे त्यांचे कार्य समाजासमोर आलेच पाहिजे असे आम्हाला वाटते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करणाऱ्यांना उत्तर देणे हे आमचे नॅरेटिव्ह नसून ‘वीर सावरकर, सिक्रेट फाइल्स’ या वेबसीरिजच्या माध्यमातून इतिहासाला अवगत असणारे, ज्याचे पुरावे उपलब्ध आहेत, जे पुरावे तार्किक दृष्टीने मांडता येतील आणि त्यातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्व जसे होते तसे मांडण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे

सावरकर यांचे जीवन हा जवळपास १०० वर्षांचा इतिहास आहे. यातून लोकांनी त्यातून प्रेरणा घ्यावी, लोकांचे गैरसमज दूर व्हावे, राजकीय, सामाजिक स्वार्थांसाठी तयार केले जाणारे नॅरेटिव्ह पुसले जावे असा आमचा प्रयत्न असणार आहे. शिवाजी महाराज यांच्या व्यतिरिक्त सावरकर यांचे कुणीही गुरु नव्हते. सावरकर जन्मतः नेते होते. एकलव्यासारखी त्यांची वाटचाल आहे. सिक्रेट फाईल्स म्हणजे सावरकरांचे व्यक्तिमत्व जे लोकांना माहित नाही ते अनफोल्ड करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.

पुढे बोलताना सोमण म्हणाले की, आजपर्यंत सावरकर यांच्यावर आधारित नाटक, चित्रपट आले परंतु वेब सीरिजच्या माध्यमात प्रथमच ही मालिका समोर येणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संपूर्ण जीवनावर हिंदी भाषेतील चार सीझनमध्ये ही वेबसिरीज असणार आहे. पहिल्या सिझनमध्ये सावरकर यांच्या जन्मापासून म्हणजे १८८३ ते मार्सेलिस येथे समुद्रात उडी मारण्यापर्यंतचा कालखंड पाहता येणार आहे.

डॉ. अनिर्बान सरकार म्हणाले, सावरकर हे जन्मतः क्रांतिकारी होते. त्यांचे खरेखुरे व्यक्तिमत्व समाजासमोर येण्याची गरज होती. कारण सेल्युलर जेल, कोलू ओढला, त्यांनी बोटीतून मारलेली उडी एवढेच लोकांना माहित आहे. मात्र स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे योगदान, त्यांनी केलेला त्याग यांच्याबद्दलचे वास्तव कुणालाच माहिती नाही. त्यांचे जीवनकार्य संपूर्ण देशाला माहित व्हावे यासाठी हिंदी भाषेत ही वेबसिरीज समोर आणणार आहोत. लोकांनी या वेब सीरिजला भरभरून प्रतिसाद द्यावा आणि सावरकर समजून घ्यावेत अशी अपेक्षा आहे. सावरकर यांच्या जीवनावर आधारित कलाकृती सादर करावी हे माझे स्वप्न होते, ते या वेब सीरिजच्या निमित्ताने पूर्ण होणार आहे.

You Might Also Like

पंचपिटिका रहस्याच्या शोधात नेत्रा
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘धर्मवीर २’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न
‘लग्नकल्लोळ’ चे दुसरे गाणे प्रदर्शित
उज्जैनमधील महाकाल मंदिराला गायक मिका सिंग यांनी दिली भेट
मकरंद, तेजस्विनीचा 'छापा काटा' आता ओटीटीवर !

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article महाराष्ट्र केसरी साठी 27 ऑक्टोबर ला जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धा
Next Article नाशिक : फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?