अहमदनगर, 20 ऑक्टोबर : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ संलग्न अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघाची बैठक जिल्हाध्यक्ष आमदार संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली असून महाराष्ट्र केसरी किताब निवड चाचणी कुस्ती स्पर्धेचे २७ ऑक्टोबर रोजी गंगा उद्यान जवळील खेळाच्या मैदानावर होणार आहे.महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खा.रामदास तडस यांनी अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघ हा राज्य कुस्तीगीर संघाशी संलग्न आहे,असे पत्र दिले आहे अशी माहिती अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे सचिव पै.संतोष भुजबळ यांनी दिली
अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष आ.संग्राम जगताप बोलत होते.
आ.संग्राम जगताप म्हणाले,की नगर जिल्हा हा देशात कुस्ती क्षेत्रामध्ये नावाजलेला जिल्हा आहे.जिल्ह्यातील युवा खेळाडूंना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही सर्वजण मिळून काम करू. राज्य शासनाच्या खेळाडूंसाठी असणाऱ्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे काम केले जाणार आहे.याचबरोबर चांगले खेळाडूंना राज्य सरकारच्या सेवेत रुजू करून घेण्यासाठी प्रयत्न करू.नगर जिल्ह्याच्या कुस्ती क्षेत्राला नाव लौकिक मिळून देऊ.निवड चाचणी स्पर्धेमध्ये खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग नोदवावा.महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाची अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघ संलग्न असून वर्षभर कुस्तीपटूंसाठी चांगले काम उभे करू असे ते म्हणाले.
