cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Entertainment > गीतकार मंगेश कांगणे यांचे संगीतकार म्हणून पदार्पण
Entertainment

गीतकार मंगेश कांगणे यांचे संगीतकार म्हणून पदार्पण

CliQ INDIA
Last updated: April 14, 2024 2:09 pm
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE

मुंबई, 14 एप्रिल : सूर निरागस हो, माझा आनंद हरपला अशा उत्तमोत्तम गाण्यांचे गीतकार मंगेश कांगणे आता संगीतकार झाले आहेत. आगामी अप्सरा या चित्रपटातील गाणी मंगेश कांगणे यांनी संगीतबद्ध केली असून या निमित्ताने गीतकाराने संगीतकार होण्याचा दुर्मीळ योग साधला गेला आहे. लेखक, दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि अभिनेता, निर्माता मंगेश देसाईं यांच्या शुभहस्ते चित्रपटाचे म्युझिक लॉन्च करण्यात आले. याप्रसंगी चित्रपटाची संपूर्ण टीम आवर्जून उपस्थित होती. येत्या १० मे ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

सुनील भालेराव यांच्या ‘श्रमण फिल्म्स’ या निर्मिती संस्थेतर्फे “अप्सरा” चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून, त्यांची ही पहिलीच निर्मिती आहे. चित्रपटसृष्टीत अनेक वर्षं कार्यरत असलेल्या चंद्रकांत पवार यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन केलं आहे. मंगेश कांगणे गेली अनेक वर्षं मराठी चित्रपटसृष्टीत गीतकार म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या लेखणीनं अनेक हिट गाणी मराठी चित्रपटांना दिली आहेत. त्या शिवाय अनेक म्युझिक अल्बमसाठीही त्यांनी गाणी लिहिली आहेत. भावगर्भ, सहजपणे तोंडी रुळणारी शब्दरचना, व्यक्तिरेखेची नेमकी अभिव्यक्ती, कथानकाची नेमकी गरज ओळखून गीतलेखनामध्ये मंगेश कांगणे माहीर आहेत. आता गीतलेखनाच्या पुढे जात मंगेश यांना सुरांचीही संगत लाभली आहे.

२०१३ मध्ये माझी पहिली फिल्म दुनियादारी आली आणि त्यातील टिकटिक वाजते डोक्यात या माझ्या पहिल्याच गीताला रसिक प्रेक्षकांचे अफाट प्रेम मिळाले. आज जवळपास १० वर्षांहून अधिक या क्षेत्रात काम करुन जवळपास १२५हुन अधिक चित्रपटांसाठी मी काम केले आहे. अनेक दिग्गज लोकांसोबत काम करण्याची संधी मला मिळाली. खुप नवनवीन गोष्टी मला शिकायला मिळाल्या. यातूनच आपणही संगीतकार म्हणून या क्षेत्रात पाऊल टाकावे या गोष्टींसाठी मी उत्सुक होतो आणि अप्सरा च्या निमित्ताने मला ही संधी चित्रपटाचे निर्माते सुनील भालेराव आणि दिग्दर्शक चंद्रकांत पवार यांनी मला दिली यासाठी मी त्यांचा आभारी आहे.

अप्सरा चित्रपटातील तीन गाणी मंगेश कांगणे यांनी केली आहेत. या तीनही गाण्यांचं लेखन आणि संगीत दिग्दर्शन मंगेश यांनी केले आहे. गायक अभय जोधपूरकर गायिका आनंदी जोशी, ओंकार स्वरुप, भैय्या मोरे, मेघा मुसळे यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गीते स्वरबद्ध करण्यात आली आहेत. सुयश झूंजुरके, मयूरी आव्हाड, अक्षता पाडगावकर, मेघा घाडगे, शशांक शेंडे, विट्ठल काळे विजय निकम, मयूर पवार, राजेश भोसले, आशिष वारंग आदी कलाकारांच्या या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहेत. राजा फडतरे यांनी कॅमेरामन, निलेश राठोड संकलन तर सुबोध आरेकर, इमरान मालगुणकर, कृतिक माज़िरे यांनी नृत्यदिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे.

अप्सरा चित्रपटात एक अनोखी प्रेम कथा अतिशय रंजकपणे मांडण्यात आली असून अप्सरा कोण असेल हे समजून घेण्यासाठी आपल्याला अजुन थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. आजवर गीतकार म्हणून हिट गाणी नावावर केलेल्या मंगेश कांगणे यांच्या नावावर संगीतकार म्हणून ही हिट गाणी जोडली जातील यात शंका नाही.

You Might Also Like

‘सिल्व्हर पिकॅाक इंटरनॅशनल सेक्शन’मध्ये ‘गोंधळ’ला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार
अक्षराचा जीव धोक्यात !
कांचन अधिकारी यांच्या नव्या आशयघन ‘जन्मऋण’ चित्रपटाचे पोस्टर लॉन्च
उमाची नृत्यकला पाहिल्यावर काय करतील रघुनाथ खोत ?
निशीच्या लग्नाला उमा आणि ओवीचा शृंगार

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन रेड्डी जखमी, निवडणूक प्रचारादरम्यान दगडफेक; अरुंद डोळा
Next Article ईराणने ताब्यात घेतले इस्त्रायली मालवाहू जहाज
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?