
मुंबई, 13 ऑगस्ट, (हिं.स.)। सोनी मॅक्स हे हिंदी चित्रपट रसिकांसाठी एक मोठे प्रीमियर डेस्टिनेशन आहे. या वाहिनीवर बॉलीवूड ब्लॉकबस्टर्स, कल्ट क्लासिक्स आणि लोकप्रिय, डब केलेले हॉलीवूड चित्रपट सादर होत असतात. सोनी मॅक्स आपला ‘अब तक बच्चन’ मोहोत्सव पुन्हा घेऊन येत आहे. ‘अब तक बच्चन’ ची सुरुवात सोनी मॅक्स द्वारे मे 2007 मध्ये करण्यात आली होती. आता सोनी मॅक्स आणि सोनी मॅक्स2 त्यात आणखी भर घालत आहेत. यावेळी सोनी मॅक्स आणि सोनी मॅक्स2 वर या महोत्सवाच्या अंतर्गत ‘वॉच अँड विन’ स्पर्धा असणार आहे, ज्यात प्रेक्षकांना ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर स्टुडिओ प्रेक्षक या नात्याने उपस्थित राहून प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.
‘अब तक बच्चन’ हा विशेष चित्रपट महोत्सव 11 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट दरम्यान सोनी मॅक्सवर रात्री 10:30 वाजता आणि सोनी मॅक्स2 वर रात्री 8 वाजता दाखवण्यात येणार आहे. KBC सीझनच्या आरंभी एक रोमांचक मिश्रण करण्यासाठी तसेच महानायक अमिताभ बच्चन यांच्या चिरस्थायी वर्ष्याचा उत्सव साजरा करण्याच्या दुहेरी उद्देशाने हा महोत्सवाची रचना करण्यात आली आहे. प्रेक्षकांसाठी निश्चितपणे आशा आणि रोमांच जागृत करणारी ही संधी आहे, कारण,भारतीय सिनेमा आणि टेलिव्हिजनवरील महानायकाला प्रत्यक्ष बघणे हे त्यांच्या असंख्य चाहत्यांसाठी एक स्वप्न असते.
सहभागी होण्याच्या रोमांचक संधीसाठी तयार व्हा, या महोत्सवातील चित्रपट बघा. चित्रपट बघताना नमूद केलेल्या व्हॉट्सअॅप नंबरवर फक्त सोनी मॅक्स टाइप करून किंवा स्क्रीनवर दिसणारा QR कोड स्कॅन करून 4 सोप्या प्रश्नांची उत्तरे द्या. त्यानंतर, काही सोप्या स्टेप्स तुम्हाला पूर्ण करण्यास सांगितले जाईल. तुमची माहिती आणि संमती तुम्हाला भरून द्यावी लागेल. तुमच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या प्रश्नांच्या विकल्पांमधून अचूक विकल्प निवडून उत्तरे द्या आणि ती सबमिट करा. तुम्हाला KBC प्रत्यक्ष बघण्याची आणि बिग बींना भेटण्याची संधी मिळू शकते!
महानायकाला भेटण्याची संधी हातची जाऊ देऊ नका. ‘अब तक बच्चन’ फिल्म महोत्सव चालणार आहे 11 ऑगस्ट पासून 22 ऑगस्ट पर्यंत रात्री 10:30 वाजता सोनी मॅक्सवर आणि रात्री 8 वाजता सोनी मॅक्स2 वर.
—————
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर
