मुंबई, 19 डिसेंबर (हिं.स.) : या आठवड्यात एण्ड टीव्हीवरील मालिका ‘अटल’, ‘हप्पू की उलटन पलटन’ आणि ‘भाबीजी घर पर है’मध्ये रोमांचक ट्विस्ट्स पाहण्यासाठी सज्ज राहा.
मालिका ‘अटल’मधील आगामी एपिसोडबाबत सांगताना कृष्णन बिहारी वाजपेयी म्हणाले, ”कृष्णन बिहारी वाजपेयी (आशुतोष कुलकर्णी) ब्रिटीश पोलिस येण्यापूर्वी अटल (व्योम ठक्कर), श्याम लाल (मिलिंद दस्ताने) आणि कृष्णा देवी (नेहा जोशी) यांना बटेश्वरला पाठवतात. तसेच, कृष्णा देवी व श्यामलाल चिंतित असतात आणि कृष्णन बिहारीने त्यांना कोणतेही कारण न सांगता बटेश्वरला पाठवण्यावर त्यांचा विश्वास बसत नाही. दरम्यान, एडवर्ड व तोमर पोलिसांसोबत येत ग्वाल्हेरमधील अटलच्या कुटुंबियांना प्रश्न विचारतात. प्रश्न विचारत असताना एडवर्ड प्रेमला दुखावण्याचा प्रयत्न करतो, पण कृष्णन बिहारी हस्तक्षेप करत प्रेमला वाचवतो. बटेश्वरमध्ये, एक माणूस अटलप्रमाणे शिक्षणासाठी ग्वाल्हेरला जाण्याची विनंती करणाऱ्या त्याच्या मुलाला मारहाण करतो, पण श्याम लाल त्या मुलाला वाचवतात. कृष्णन बिहारी व अटल पत्र लिहित त्यांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करतात. ”
एण्ड टीव्हीवरील मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मधील आगामी एपिसोडबाबत सांगताना दरोगा हप्पू सिंग म्हणाले, ”कटोरी अम्मा (हिमानी शिवपुरी) आणि मुले हप्पूसाठी (योगेश त्रिपाठी) सरप्राइज बर्थडे पार्टीचे नियोजन करतात. दरम्यान, हप्पूच्या कुटुंबाच्या जवळच्या नात्यामधील एक मुलगी तिच्या प्रियकरासोबत पळून जाते. हप्पूला या गोष्टीचा खूप राग येतो आणि तो ही बातमी त्याच्या मुलांपासून लपवून ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो. तो राजेशला (गीतांजली मिश्रा) त्यांच्यावर नजर ठेवण्यास सांगतो. दुसऱ्या दिवशी हप्पू आणि राजेश चमचीला (झारा वारसी) एका मुलासोबत बोलताना पाहतात, तर ऋतिक (आर्यन प्रजापती) व रणबीर (सोम्या आझाद) यांना दारू खरेदी करताना पाहतात. हे पाहून हप्पूला खूप राग येतो आणि त्याचे राजेशसोबत भांडण होते. यावर तोडगा काढण्यासाठी राजेश काटेला (गझद सूद) घरातील काम करण्यास सांगते, ज्यामुळे तिला तिच्या मैत्रिणींसोबत बाहेर जाता येणार नाही. त्यानंतर एक डिलिव्हरी बॉय हप्पूच्या बर्थडे सरप्राइजसाठी मुलांनी ऑर्डर दिलेला केक व दारू डिलिव्हरीसाठी घेऊन येतो. हप्पूला त्याचा राग येतो आणि डिलिव्हरी बॉयला पळवून लावतो. असे करत तो स्वत:च्या बर्थडे सरप्राइजमध्ये विघ्न आणतो.”
एण्ड टीव्हीवरील मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील आगामी एपिसोडबाबत सांगताना विभुती नारायण मिश्रा म्हणाले, ”प्रेम (विश्वजीत सोनी) विभुतीला (आसिफ शेख) जुगाराचा प्लॅन सुचावण्यासह दीड लाख रूपयांची व्यवस्था करण्यास सांगतो. विभुती तिवारीकडून (रोहिताश्व गौड) हे पैसे उसने घेतो, पण तिवारी एक अट ठेवतो की पैसे तीन दिवसांमध्ये परत केले नाही तर विभुतीला दंड व शिक्षा केली जाईल. जुगार जिंकण्याची खात्री असलेला विभुती त्याची अट मान्य करतो. दुसरीकडे अम्माजी (सोमा राठोड) तिवारीला अब्जाधीश बनण्यासाठी पंडित रामफलचा उपाय सांगते. ती त्याला काही गरजूंना खायला देण्यासह मदत करण्यास सांगते. पण, तिवारीला वाटते की त्याने अगोदरच गरजू विभुतीला मदत केली आहे आणि त्याला खायला दिले तर त्याचे अब्जाधीश बनण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. दुर्दैवाने, विभुती जुगाराचा खेळ हरतो. याबाबत माहित नसलेला तिवारी विभुतीला डिनरचे आमंत्रण देतो, पण विभुती त्याबाबत टाळाटाळ करतो. शिक्षा मिळण्याच्या भितीने विभुती स्वत:चे घर सोडून जातो. अनिता (विदिशा श्रीवास्तव) व तिवारी त्याचा शोध घेण्यासाठी आणि हरवल्याची तक्रार दाखल करण्याकरिता हप्पू सिंगकडे (योगेश त्रिपाठी) जातात.”
हिंदुस्थान समाचार
