नाशिक, 2 ऑगस्ट (हिं.स.)। : पद्मश्री कर्मवीर काकासाहेब वाघ (गुरु) व त्यांचे शिष्य सहकार महर्षी कै. माधवराव तथा तात्यासाहेब बोरस्ते व काकुशेठ उदेशी यांच्या स्मृती प्रित्यर्थ व कै. बाळासाहेब (भाऊ) वाघ यांचे प्रेरणेने ४२ व्या गुरु-शिष्य स्मृतिमाह जिल्हास्तरीय स्पर्धे अंतर्गत गुरुवार, दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी दुपारी ३ वाजता सरस्वतीनगर कॅम्पस येथील डाॅ. पंजाबराव देशमुख सभागृह येथे पार पडला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हसरुळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण व जेष्ठ पत्रकार तथा दैनिक महाराष्ट्र टाईम्सचे संपादक संपत थेटे व माजी प्राचार्य अरुण आहेर हे उपस्थित होते. या प्रसंगी व्यासपीठावर मुक्तांगणचे चिटणीस प्रा. शि. क. नाठे, समन्वयक डॉ. व्ही एम. सेवलीकर, समन्वयक डॉ. भूषण कर्डिले व आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. व्ही एम. सेवलीकर यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. भूषण कर्डिले यांनी मांडले. वक्तृत्व स्पर्धेत शहर व ग्रामीण विभागात इयत्ता ५ वी ते ७ वी वयोगटातील विद्यार्थ्यांनी मी अंतराळवीर शुभांशु शुक्ला बोलतोय, चांगले खा निरोगी राहा, विठ्ठल आमचा सखा व माझे आजोळ यांविषयावर तर इयत्ता ८ वी ते १० वी वयोगटातील विद्यार्थ्यांनी ऑपरेशन सिंदूर, मोबाईल माझा सवंगडी, मला आवडलेले पुस्तक व ए. आय एक उत्तम गुरु यांवर वकृत्व सादर केले. तसेच शास्त्रीय नृत्य स्पर्धेत कथ्थक, भरतनाट्यम, ओडिसी इ. नृत्य प्रकार सादर करण्यात आले. स्पर्धेत ३०० हून अधिक विदयार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
शास्त्रीय नृत्य स्पर्धेत अनुक्रमे शहरी व ग्रामीण गटात प्रथम क्रमांक शरण्या नवले व उर्वी सोनवणे, द्वितीय क्रमांक भूमिका गवई व अनन्या मोरे, तृतीय क्रमांक रजित नायर व नक्षत्रा आगळे, उत्तेजनार्थ हर्षदा विश्वकर्मा व तेजस्विनी गायकवाड तसेच वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रीराम चव्हाण व मोक्षा पारख, द्वितीय क्रमांक वेदांत वलक व आस्था भन्साळी, तृतीय क्रमांक गौरव डैर्ले व देविदास शिंदे आणि उत्तेजनार्थ जान्हवी चव्हाण व आसावरी घंगाळे यांना पारितोषिके प्राप्त झाली.
श्री. संपत थेटे म्हणाले, की शालेय व महाविद्यालयीन जीवनात वकृत्व कौशल्य व शैली अवगत होत असते. वकृत्व स्पर्धेचे वैशिष्ट्य असे, की त्याचा रंग, जात, धर्म, वय, आदी बाबींची कोणतीही अडचण येत नाही. तसेच स्वावलंबी शिक्षण खूप महत्वाचे असून अशा स्पर्धांमधून विद्यार्थी घडतात. स्पर्धेत सहभागी होतांना जय- पराजय याचा विचार न करता स्पर्धेत सामोरे जावे. त्यातून आपल्या व्यक्तीमत्त्व विकासाला चालना मिळते असे प्रतिपादन अंकुश चिंतामण यांनी केले.
वकृत्वातून विद्यार्थ्यांनी मांडलेले विचार व वकृत्व हे माणसे जोडण्याचे साधन असल्याचे मत प्रा. शि. क. नाठे यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. प्रियांका ब्राह्मणे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा.सुनील बैरागी यांनी मांडले.
—————
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV
