पुणे, 21 नोव्हेंबर, (हिं.स) – श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ७५३ व्या जयंतीनिमित्त नामदेव समाजोन्नती परिषद पुणे व पिंपरी-चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमानाने बहुरूपी भारूड या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. बुधवार (ता.२२) नोव्हेंबरला स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सायंकाळी ५. ३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती पुणे शाखेचे अध्यक्ष संदीप लचके यांनी दिली.
सध्याची तरुण पिढी मोबाईल, सोशल मीडियाच्या विळख्यात आहे. संत साहित्य व लोककला लोप पावत आहे. तेव्हा लोककलेचा प्रसार व प्रचार होणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन बहुरूपी भारूडचे आयोजन केले आहे. डॉ. रामचंद्र देखणे साहित्य कला प्रतिष्ठानच्या वतीने भारूड चे सादरीकरण होणार आहे. ३५ हुन अधिक कलाकार आपली कला सादर करतील. या पत्रकार परिषदेस एकनाथ सदावर्ते, कैलास नेवासकर, रेखा गाडेकर, सुभाष मुळे, रणजित मारवादे आदी उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार
