नाशिक, २१ नोव्हेंबर, (हिं.स.) – खाकीला काळीमा फासणारी घटना नाशिकमध्ये घडली आहे. सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. त्याचा अर्थ असा की नागरिकांचे रक्षण करण्यास ते कटिबद्ध आहेत त्यातच एका घटना घडली आहे. चक्क पोलीस कर्मचाऱ्यांनी एका महिलेची सोनसाखळी ती पण जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानापासून चोरली. आत्तापर्यंत आपण भुरटे चोर हे सोनसाखळी चोरताना पाहिले आहेत. लक्ष्मीपूजनच्या दिवशी लोंढे याने त्याच्या मित्राच्या मदतीने ही सून साखळी चोरली होती.
मात्र या दोघं मित्रांमध्ये दारू पिताना वाद झाला आणि एका मित्राने कबुली दिली आणि या चोरट्या पोलिसाचे भांडे फुटले. या भुरट्या पोलिसास अटक केली असून सरकार वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश शंकर लोंढे असे संशयित पोलिसाचे नाव आहे. तो सध्या गंगापूर शहर पोलीस या ठिकाणी कार्यरत आहे. याला याआधीही मुंबई नाका पोलीस ठाण्यात पाच हजार रुपयांची लाच घेताना अटक केली होती याचे निलंबन दोन दिवसांपूर्वी संपल्यानंतर पुन्हा येणे चैन साखळी चोरण्याचा प्रयत्न केला होता.
त्रंबक रोड वरील जिल्हाधिकारी निवासस्थाना जवळून एक महिला पायी जात होती. त्यावेळेस योगेश लोंढे हा मध्य अवस्थेत दुचाकीवरून आला व व पायी चालणारा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र ओरबडून नेले. त्यानंतर महिलेने ओरडा ओरडा केला व सोबतच असलेले त्याचे अल्पवयीन मित्र यांच्यात काही बाचाबाची झाली व त्या मित्राने सरकार वाडा पोलीस स्टेशनला कबुली दिली. सरकार वड्या पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले व त्यांनी अल्पवयीन मुलांकडून माहिती घेतली असता शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नलावडे यांनी लोंढे याला काही वेळच ताब्यात घेतले व चौकशी केली असता पोलीस शिपाई असल्याचे समोर आले. पुढील तपास गुन्हा शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नलावडे करीत आहेत.
हिंदुस्थान समाचार
