मुंबई, ३१ ऑक्टोबर, (हिं.स) : प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ डॉ. अलका नाईक यांची दादासाहेब फाळके चित्रपट युनियन च्या मानसिक स्वास्थ्य सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली आहे. दादासाहेब फाळके चित्रपट युनियन चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अजीत म्हामूणकर यांनी डॉ. अलका नाईक यांना या नवीन नेमणुकीचे पत्र दिले असून मुंबई विभागीय दादासाहेब फाळके चित्रपट युनियन च्या मानसिक स्वास्थ्य सल्लागार पदी आपली निवड करण्यात येत आहे. संघाची ध्येय धोरणे व कार्यक्रम राबवितांना समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देऊन संघटना मजबुतीसाठी आपण प्रामाणिक प्रयत्न कराल अशी अपेक्षा या पत्रात व्यक्त केली आहे.
हिंदुस्थान समाचार
