मुंबई, 30 डिसेंबर (हिं.स.) नवीन वर्षामध्ये अनेक व्यक्ती नवीन वर्षाचे संकल्प करण्याची रीत पाळतात. हे संकल्प जीवनाच्या विविध पैलूंमध्ये आत्म-सुधारणा करण्याच्या आकांक्षा दर्शवतात. तुमच्या आवडत्या कलाकारांनीही २०२४ साठी काही संकल्प केले आहेत जे त्यांनी इथे व्यक्त केले
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ नेत्रा म्हणजे तितिक्षा तावडेनी सांगितले, मी २०२४ साठी हा संकल्प केले आहे कि मी चित्रकला, नवीन अनोळखी आणि वेगळी ठिकाणे शोधून त्या जागा फिरणे अश्या छोट्या- छोट्या गोष्टी ज्या मला आनंद देतात त्या गोष्टींना मी वेळ देणार आहे. माझ्या युट्यूब चॅनलचे वर खूप प्रगती कारेन कारण मला माझ्या चॅनेलसाठी व्हिडियो बनवायला खूप मज्जा येत आहे. नवीन गोष्टी वाचून आणि बघून अभिनय कौशल्ये मध्ये सुधार करणार. पातळ होण्यावर ताण न ठेवता त्याऐवजी सातत्यपूर्ण व्यायाम करून, योग्य आहार घेऊन तंदुरुस्त राहण्यावर लक्ष केंद्रित करणार मी २०२४ मध्ये.
सर्वांची लाडकी अक्षरा म्हणजेच ‘तुला शिकवीन चांगलाच धडाची’ शिवानी रांगोळेने २०२४ चा संकल्प करताना सांगितले कि, मी नवीन वर्ष मध्ये ध्यान हे माझ्या रोजच्या दिनचर्या नक्की असेल आणि कुटुंबावर अधिक लक्ष केंद्रित करणार कारण त्यांच्यासोबत वेळ घालवणे माझ्यासाठी खूप आनंददायी ठरते. ह्या वर्षी शूटिंगच्या गडबडीत ह्या दोन गोष्टींवर २०२३ मध्ये खूप दुर्लक्ष झाले आहे पण आता नाही मी जस ठरवलं आहे तसाच करणारा.
‘अप्पी आमची कलेक्टरचा’ अर्जुन म्हणजे रोहित परशुरामनि २०२४ च्या संकल्पा मध्ये सांगितले, ‘आपलं काम प्रामाणिक पणे करत राहायचं हे तर आहेच पण एक गुप्त संकल्प आहे जे सध्या फक्त मलाच माहिती आहे. काही महिन्यातच ते संकल्प पूर्ण होईल आणि महाराष्ट्र समोर माझं ते गुपित प्रेक्षकांच्या समोर येईल. २०२४ मध्ये उत्तम काम आणि आरोग्याची काळजी घेईन.
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ इंद्राणी म्हणजे श्वेता मेहेंदळेनी सांगितले’ दरवर्षी मी एक संकल्प करते कि आठवड्यला एक पुस्तक म्हणजेच वर्षाला ५२ पुस्तक वाचून झालीच पाहिजे. हा संकल्प मी अनेक वर्ष पासून धरतेय पण अजून पर्यंत तो पूर्ण झालेला नाही म्हणून २०२४ मध्ये ५२ पुस्तक वाचून पूर्ण करायचा संकल्प मी पूर्ण करणार आहे. दुसरा संकल्प आहे कि २०२३ मध्ये कोकण आणि गोवा अश्या राइड्स केल्या होत्या तर २०२४ मध्ये लांबची राइड कराची आहे फक्त ‘सातव्या मुलीची सातवी मुलगीच्या’ शूटिंग मधून वेळ कसा काढायचा ह्याच नियोजन मला करायचं आहे. तर हे दोन मोठे संकल्प आहेत २०२४ मध्ये.
‘सारं काही तिच्यासाठी’ मधली निशिगंधा खोत म्हणजे दक्षता जोइलनी सांगितले, शूटिंग मध्ये व्यस्त असताना खूप छान चित्रपट आणि वेब सिरिज बघणं राहून जातात. दुसऱ्या कलाकारांचे छान काम बघून खूप शिकायला ही मिळत आणि मला चित्रपट आणि वेब सीरिज पाहायला ही आवडत. तर मी निशचय करीन स्वतःशी कि २०२४ मध्ये जितके जास्त सिनेमे पाहायला मिळतील तितके अगदी वेळ काढून बघीन.
२०२४ मध्ये तुम्हीही उत्तम संकल्प करा आणि एक संकल्प हाही करा कि जे संकल्प केले आहेत ते यथार्थपणे पूर्ण करा. नवीन वर्षाचे त प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा!
हिंदुस्थान समाचार
