मुंबई, 15 जानेवारी (हिं.स.) : पतंगाचा उत्सव म्हणून ओळखला जाणारा मकर संक्रांती सण संपूर्ण भारतात जल्लोषात व उत्साहात साजरा केला जातो. वसंत ऋतूच्या शुभारंभाचे प्रतीक असलेला हा सण पतंग उडवत उत्साहात साजरा केला जातो. एण्ड टीव्ही कलाकार या शुभ सणादरम्यान पतंग उडवण्याच्या त्यांच्या पहिल्या अनुभवांना उजाळा देत आहेत. हे कलाकार आहेत व्योम ठक्कर (यंग अटल, ‘अटल’), गीतांजली मिश्रा (राजेश सिंग, ‘हप्पू की उलटन पलटन’) आणि शुभांगी अत्रे (अंगूरी भाबी, ‘भाबीजी घर पर है’.
एण्ड टीव्हीवरील मालिका ‘अटल’मध्ये यंग अटलची भूमिका साकारणारा व्योम ठक्कर म्हणाला, ”आम्ही गुजराती मकर संक्रांती सण उत्तरायन म्हणून उत्साहात साजरा करतो. या सण साजरा करण्यासाठी आमचे संपूर्ण कुटुंब एकत्र येते. आम्ही प्रार्थना करत सण साजरीकरणाची सुरूवात करतो आणि त्यानंतर घराच्या छतावर जाऊन पतंग उडवण्याच्या पारंपारिक प्रथेचा आनंद घेतो. आमच्यासाठी ही उत्साहवर्धक परंपरा बनली आहे. मला आजही पतंग उडवण्याचा माझा पहिला अनुभव आठवतो. सुरूवातीला, मला आकाशात उडणारे अनेक पतंग पाहून काहीशी चिंता वाटली आणि मला पतंगाचा मांजा धरून पतंग कसा उडवावा याबाबत माहित नव्हते. त्यावेळी माझ्या वडिलांनी मला काळजीपूर्वक मांजा हाताळण्याच्या कलेबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी मला पतंग हवेत उडल्यानंतर मांजा एका हातात धरून दुसऱ्या हाताने त्यावर नियंत्रण ठेवण्याबाबत शिकवले. सुरूवातीला मला पतंग उडवायला जमले नाही, पण मी हार मानली नाही. मी यशस्वी ठरण्याच्या आशेसह पतंग उडवण्याचा प्रयत्न करत राहिलो. हळूहळू, पण स्थिरपणे मी पतंग उडवायला शिकलो आणि मी व माझे वडिल आता कुशलपणे पतंग उडवू शकतो. आकाशामध्ये माझे पतंग उडताना पाहण्याचा आनंद अत्यंत समाधानकारक होता. वर्षानुवर्षे मी माझ्या पतंग उडवण्याच्या कौशल्यांना इतके निपुण केले आहे की, आता स्वत:ला पतंग उडवण्यामधील माहिर मानू शकतो. आता या पारंपारिक व उत्साहवर्धक पतंग उडवण्याच्या स्पर्धेमध्ये मला हरवणे इतरांसाठी आव्हानात्मक झाले आहे.”
मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मधील गीतांजली मिश्रा ऊर्फ राजेश सिंग म्हणाल्या, ”उत्तर प्रदेशमध्ये फक्त मकर संक्रांतीला नाही तर वर्षभर पतंग उडवण्याचा आनंद घेतला जातो. वर्षभर आकाशात विविध रंगांचे पतंग उडताना पाहायला मिळतात. बालपणी मी माझ्या घराच्या छतावर खूप वेळ पतंग उडवायचे. मकर संक्रांती सण साजरा करण्यासाठी दोन आठवडे अगोदरच तयारीला सुरूवात करायचो. माझ्या मैत्रिणी आणि मी भरपूर पतंग खरेदी करून ठेवायचो. भरपूर खरेदी केलेल्या पतंगांसह आम्ही आमच्या घराच्या छतांवर जायचो आणि आकाशामध्ये एकमेकांच्या पतंगांना कापण्याची स्पर्धा खेळायचो. एकमेकांचे पतंग कापण्याचा थरार आणि कापलेले पतंग पकडण्यासाठी एका छतावरून दुसऱ्या छतावर धावण्याचा आनंद आजही आठवतो. पतंग पकडण्याच्या या आनंदामध्ये एक घटना माझ्या आजही आठवणीत आहे. पतंग पकडण्याच्या नादात मी खाली पडले आणि मला काहीशी दुखापत झाली. मी माझ्या आईपासून ही घटना लपवून ठेवली. पण, आईमध्ये विलक्षण अंतर्ज्ञान क्षमता असते आणि मला लवकरच सत्य सांगावे लागले. यामुळे माझे सर्व कुटुंबिय काहीसे चिंताग्रस्त झाले. यामधून पूर्वजांपासून जोखीम पत्करण्याची आमची परंपरा मला समजली. माझ्या मूळगावी पतंग उडवण्याचे ते उत्साहपूर्ण दिवस आजही माझ्या स्मरणात आहेत. माझ्याकडे आजही पतंगांचे कलेक्शन आहे, ज्यामधून बालपणीच्या उत्साहपूर्ण आठवणी जागृत होतात. या पतंगांमध्ये आनंद, साहचर्य आणि कधी-कधी होणाऱ्या दुर्घटनांच्या आठवणी सामावलेल्या आहेत, ज्यामधून फक्त सणानिमित्त नाही तर वर्षभर आकाशात पतंग उडवण्याचा उत्साह दिसून येतो.”
मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील शुभांगी अत्रे ऊर्फ अंगूरी भाबी म्हणाल्या, ”पतंग उडवण्याचा माझा अनुभव अत्यंत संस्मरणीय आहे. मला आकाशामध्ये पतंग उडवण्याचा आनंद घेण्याची संधी मिळाली. सुरूवातीला पतंग उडवण्याबाबत उत्साह व उत्सुकता होती. आकाशात उडणाऱ्या अनेक आकर्षक पतंगांनी माझे लक्ष वेधून घेतले, ज्यामुळे मी स्वत: पतंग उडवण्यास उत्सुक झाले. आकाशात उडणारे अनेक पतंग पाहून मी देखील पतंग उडवण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाही. अखेर मी पतंग उडवायला शिकले आणि त्यासह आकाशात उंचावर पतंगाला उडवले. आकाशात माझ्या पतंगाला उडताना पाहण्याचा अनुभव शब्दांमध्ये सांगता येऊ शकत नव्हता, मला खूप आनंद झाला होता. त्या दिवसातील उत्साहवर्धक आठवण म्हणजे मी पतंग उडवण्यावरून माझ्या बहिणींसोबत मस्करीत भांडण करायचे. त्यांनी मला पतंग उडवायला मदत केली नाही आणि मी पहिल्यांदा पतंग उडवण्यामध्ये यशस्वी झाल्यामुळे त्यांच्यामध्ये ईर्ष्या निर्माण झाली, तसेच या सर्व हास्यपूर्ण घटनांमध्ये मला पतंग उडवण्यामध्ये हरवण्यासाठी त्यांनी अधिक प्रयत्न केले. संपूर्ण अनुभव अद्भुत होता आणि मकर संक्रांतीचे उत्साहपूर्ण वातावरण माझ्यामध्ये आनंद जागृत करते. माझ्याकडून सर्वांना मकर संक्रांतीच्या आनंदमय शुभेच्छा!”
हिंदुस्थान समाचार
