cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Entertainment > पद्मश्री शंकर महादेवन संघाच्या कार्यक्रमात मुख्य अतिथी
EntertainmentNational

पद्मश्री शंकर महादेवन संघाच्या कार्यक्रमात मुख्य अतिथी

CliQ INDIA
Last updated: October 5, 2023 5:52 pm
CliQ INDIA
Share
4 Min Read
SHARE

नागपुरातील विजया दशमी समारोहात होणार सहभागी

नागपूर, 05 ऑक्टोबर  : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे नागपुरात आयोजित विजयादशमी सोहळ्यात यंदा ख्यातनाम गायक पद्मश्री शंकर महादेवन यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलेय. आगामी 24 ऑक्टोबर रोजी नागपुरात आयोजित संघाच्या स्थापना दिवस कार्यक्रमात शंकर महादेवन हजेरी लावणार आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात वर्षप्रतिपदा (गुडी-पाडवा), शिवराज्याभिषेक दिन, रक्षा बंधन, गुरु पौर्णिमा, विजयादशमी, मकरसंक्रांती असे 6 उत्सव साजरे केले जातात. या उत्सवांच्या आयोजना मागे संघाचे स्वतःचे असे तत्त्वज्ञान आहे. नागपुरात आयोजित होणारा विजयादशमी उत्सव आणि तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाची सांगता या कार्यक्रमांना विशेष महत्त्व आहे. संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी 27 सप्टेंबर 1925 रोजी विजयादशमीच्या दिवशी संघाची स्थापना केली होती. त्यामुळे विजयादशमी उत्सवाच्या दिवशी संघाचा स्थापना दिवस देखील असतो. या दिवशी सरसंघचालक स्वंयसेवकांचे मार्गदर्शन करतात. तसेच या कार्यक्रमाला समाजाच्या विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांना संघाच्या व्यासपीठावर अतिथी म्हणून आमंत्रित केले जाते. गेल्या वर्षी 5 ऑक्टोबर 2022 रोजी संघाच्या विजयादशमी कार्यक्रमात गिर्यारोहक पद्मश्री संतोष यादव यांना मुख्य अतिथी म्हणून गौरवण्यात आले होते. तर यावर्षी आगामी 24 ऑक्टोबर रोजी नागपुरातील रेशीमबाग मैदानात आयोजित विजयादशमी कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक पद्मश्री शंकर महादेवन यांना प्रमुख अतिथी म्हणून बोलावण्यात आलेय.

‘ब्रेथलेस सिंगर’ म्हणून देशभर ओळखलेजाणारे गायक, संगीतकार शंकर महादेवन हे मुलतः केरळच्या पलक्कड शहरातील तमिळ अय्यर कुटुंबातील आहेत. शंकर महादेवन यांचा जन्म 3 मार्च 1967 रोजी मुंबईच्या चेंबूर उपनगरात झाला. त्यांचे शालेय शिक्षण चेंबूरच्या अवर लेडी ऑफ पर्पेच्युअल सुकर हायस्कूल आणि स्वामी विवेकानंद हायस्कूलमधून झाले. त्यांनी 1988 मध्ये रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नवी मुंबई येथून कॉम्प्युटर सायन्स आणि सॉफ्टवेअर इंजिनीअरिंगची पदवी प्राप्त केली.संगीत दिग्दर्शक आणि गायक शंकर महादेवन यांच्याही आयुष्यात असेच काहीसे घडले आहे. अभियांत्रिकीची पदवीप्राप्त शंकर महादेवन यांनी चांगल्या पगाराची नोकरी सोडली आणि आपल्या अंगी असलेल्या संगीत कला, कौशल्याला आपला व्यवसाय बनवला.

शंकर महादेवन यांना आईच्या गर्भातच संगीताची देण मिळाली होती बहुतेक. लहानपणीच ते एक हार्मोनियम वादक बनले होते आणि त्यांनी वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी वीणा वाजवण्यास सुरुवात केली होती. शंकर महादेवन यांनी पंडित श्रीनिवास खळे यांच्याकडून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले आहे. तसेच, कर्नाटक शास्त्रीय संगीतातील तज्ञ टी.आर. बालामणी यांचेही त्यांना मार्गदर्शन लाभले आहे. संगीतकार-गायक शंकर महादेवन यांना वयाच्या अकराव्या वर्षी दिग्गज गायिका, भारतरत्न लता मंगेशकर यांच्यासोबत गाणे गाण्याची संधी मिळाली आणि त्यांनी आपल्या संगीत कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांचे पहिले रेकॉर्डिंग वयाच्या अकराव्या वर्षी ”राम श्याम गुण गान” नावाच्या अल्बमसाठी झाले होते. लता मंगेशकर आणि भीमसेन जोशी तेव्हा पहिल्यांदाच एकत्र आले आणि त्यांनी शंकर महादेवन यांना अल्बममध्ये काम करण्याची संधी दिली.

शंकर महादेवन यांचे नाव नेहमी शंकर-एहसान-लॉय असेच घेतले जाते. शंकर-एहसान-लॉय या त्रिकुटाची हिंदी संगीत उद्योगात ‘अमर अकबर अँथनी’ अशी ख्याती आहे. शंकर महादेवन हे मराठी, मल्याळम, तामिळ, उर्दू, हिंदी आणि इंग्रजी अशा सर्वच भाषा अस्खलित बोलतात. त्यांनी सर्वच भाषेत एकापेक्षा एक गाणी गायली आणि ती हिटसुद्धा झाली आहेत. शंकर महादेवन हे अलीकडच्या काळातील सर्वात यशस्वी गायक आणि संगीतकारांपैकी एक आहेत.शंकर महादेवन यांना 2019 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यासोबतच 28 सप्टेंबर 2011 रोजी लता मंगेशकर पुरस्कार, कल हो ना हो चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन आणि 2007 मध्ये तारे जमीन पर चित्रपटातील मा गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कारही त्यांनी पटकावला आहे.

 

You Might Also Like

‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ चित्रपट १४ जूनला संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित
छ. संभाजीनगर : ट्रक उलटून ६ जणांचा मृत्यू, ११ जखमी | BulletsIn
“ग़ज़लियत” दिल की दास्ता चे सोमवारी सादरीकरण
निवडणूक आयोगाने देशभरात तिसऱ्या टप्प्यातील एसआयआर मोहिमेचा विस्तार केला
समृद्धी महामार्ग : 4 महिने 3 अपघात 54 ठार !
TAGGED:Bollywoodnews

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article मुंबई शहरातील प्रगतीपथावरील प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत – केसरकर
Next Article 'शॅार्ट ॲन्ड स्वीट' चित्रपटातील गाणे प्रदर्शित
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?