सोलापूर, 19 फेब्रुवारी (हिं.स.)।आईविना असलेल्या अल्पवयीन मुलीच्या घरी कोणी नसल्याचे पाहून तरुणाने पीडितेच्या घरात शिरून तिच्यावर अत्याचार केला. जीवे मारण्याची धमकी देऊन त्याने सतत अत्याचार केला आणि त्यातून पीडिता गर्भवती राहिली. डिसेंबर २०२१ मध्ये ही घटना घडली होती. तिच्या फिर्यादीवरून तरुणाविरुद्ध मोहोळ पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात जिल्हा न्यायाधीश डी. एन. सुरवसे यांनी आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास व दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
लक्ष्मण विठ्ठल शिंदे (वय ३०, रा. मोहोळ) असे आरोपीचे नाव आहे. एकेदिवशी पीडितेच्या घरातील सगळेजण कार्यक्रमानिमित्त परगावी गेले होते. घरात कोणीच नाही यावर लक्ष ठेवून असलेला लक्ष्मण शिंदे हा तरुण त्या दिवशी दुपारी दोनच्या सुमारास पीडितेच्या घरात शिरला. अत्याचार करून ही घटना कोणाला सांगू नको, कोणाला सांगितले तर जीवे ठार मारीन, अशी धमकी देऊन तो निघून गेला. त्या धमकीला घाबरलेल्या तरुणीने घडलेल्या प्रकाराबद्दल कोणाला काही सांगितले नाही. परंतु, घटनेनंतर त्याने काहीवेळा अत्याचार केला. त्यानंतर काही दिवसांनी पीडितेस त्रास सुरू झाला. तिची आजी पीडितेला दवाखान्यात घेऊन गेली.
—————
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड
