सोलापूर 5 नोव्हेंबर ( हिं.स) मुस्लिम कोया जातीचा बनावट दाखला तयार करून राज्य मार्ग परिवहन महामंडळात नोकरी मिळविलेल्या एकास न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांनी तीन वर्षे कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. खतालसाब महंमद कासीम दंडु (रा. सोलापूर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी खतालसाब दंडु याची पत्नी शकिला दंडु हिने राज्यमार्ग परिवहन महामंडळाकडे नवऱ्याने बनावट जातीच्या दाखल्याच्या साह्याने १९८२ मध्ये नोकरी मिळविल्याची तक्रार केली.त्यानंतर राज्यमार्ग परिवहन महामंडळाने जात पडताळणी समितीमार्फत त्याची चौकशी केली. त्यात खतालसाब दंडु याचा जातीचा दाखला बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन २७ मे २००८ रोजी महामंडळाचे अधिकारी अशोक कांबळे यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन गुन्हा दाखल केला.
हिंदुस्थान समाचार
