जळगाव, 4 जानेवारी (हिं.स.) तालुक्यातील मौजे देऊळवाडे येथे तापी नदीच्या किनारी व आजूबाजूच्या परिसरात अवैध गावठी दारू निर्मिती सुरू होती. यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या निर्देशानुसार तसेच राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक री.व्ही.टि.भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने करून आज, ४ जानेवारी रोजी ६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात ५ लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. रसायन (कच्ची दारू)- 20200 ली. ,गावठी दारू- 222 लिटर नष्ट करण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य निर्मिती व विक्रीवर कारवाई चे सत्र चालूच ठेवले असून एप्रिल 2023 मध्ये 2022 च्या तुलनेत कारवाईमधे मोठी वाढ झाली आहे. सदरची कारवाई निरीक्षक विभागीय भरारी पथक जळगांव, निरीक्षक जळगाव, दुय्यम निरीक्षक चोपडा यांच्या पथकाने संयुक्तरीत्या पार पाडली.
हिंदुस्थान समाचार
