अकोला, 15 ऑगस्ट (हिं.स.)।
पोलीस अधिक्षक यांचे अवैध धंदया विरूध्द राबविण्यात येणा-या ऑपरेशन प्रहार अर्तगत कार्यवाही करण्यावे आदेशीत केल्या वरून अवैध धंदयावर कार्यवाही करण्या करीता गुप्त बातमी दारामार्फत माहीती प्राप्त करून कौलखेड चौक, अकोला येथे आनलाईन जुगार वर रेड केली असता आरोपी नामे कमलेश मोहनलाल रोहरा (३५) हा FUN TARGET ONLINE कसीनो गेम व ONLINE RAJSHRI LOTO गेम चे माध्यमाने पैश्यावी हारजितचा खेळ स्वताचे आर्थीक फायदया करिता खेळवितांना मिळुन आल्याने त्याचे कडुन मॉनीटर, CPU, Mouse, Key board, Wi-Fi router, RECEIPT काढण्या करीता लागणारे PRINTER, इलेक्ट्रीक बोर्ड, एक अॅन्डराईड मोबाईल असा एकुण ८६,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करून कलम ४,५ महा. जुगार अधिनीयम प्रमाणे कार्यवाही करणे करीता पोलीस स्टेशन खदान यांचे ताब्यात देण्यात आले.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक अर्चित चांडक मार्गदर्शनाखाली पो.नि. शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला. सहा. पोलीस निरीक्षक विजय चव्हाण, पोहवा फिरोज खान, उमेश पराये, खुशाल नेमाडे, पो. कॉ राज चंदेल, आकाश मानकर, धिरज वानखडे, मो. आमीर, चालक. पो. कॉ. देवानंद खरात यांनी केली.
—————
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे
