सोलापूर , 8 ऑक्टोबर : व्याजाच्या पैशाच्या बदल्यात तुझ्या नावे असलेली ५७ गुंठे जमीन आम्हाला दे, नाहीतर तुझे काही खरे नाही, असे म्हणून छळ केल्याप्रकरणी राम ज्ञानेश्वर मेटकरी (वय २७) याने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी देवयानी कुंडलिक शेंबडे, राहुल शेंबडे (रा. भीमनगर, मंगळवेढा), सचिन संगम मस्के (रा. डोंगरगाव) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.मृत राम मेटकरी हा फिर्यादी प्रभावती मेटकरी (वय ५०, रा. डोंगरगाव) यांचा मुलगा असून,वरील तिघा आरोपींनी व्याजाच्या पैशाच्या बदल्यात ५७ गुंठे जमीन मागितली व तुझे काही खरे नाही, तुला व तुझ्या आईला तुरुंगात टाकतो, अशी धमकी दिली.
