नाशिक रोड रेल्वे पोलीसांनी सात वर्षांपासून फरार असलेल्या एका कुख्यात दरोडेखोराला अटक करून मोठे यश मिळवले आहे. सुरेश काळे असे या आरोपीचे नाव असून, तो रेल्वेगाड्यांचे सिग्नल टेम्परिंग करून दरोडे टाकत असे. त्याच्या विरोधात महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि हैदराबाद येथे अनेक गुन्हे दाखल आहेत.
BulletsIn
-
नाशिक रोड रेल्वे पोलीसांनी सात वर्षांपासून फरार असलेल्या दरोडेखोर टोळीच्या मुख्य आरोपीला अटक केली.
-
आरोपी सुरेश काळे (रा. आरोळे वस्ती, जामखेड, जि. अहिल्यानगर) हा 2018 पासून फरार होता.
-
रेल्वेगाड्यांचे सिग्नल टेम्परिंग करून साथीदारांसह तो दरोडे टाकत असे.
-
सुरेश काळे विरोधात आंध्र प्रदेश, तेलंगणा, पुणे रेल्वे, छत्रपती संभाजीनगर रेल्वे, कोकण रेल्वे आणि हैदराबाद येथे गुन्हे दाखल आहेत.
-
पोलिसांनी सहाय्यक फौजदार संतोष उफाडे पाटील यांच्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपीला अटक केली.
-
या गुन्ह्यातील सात आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली होती, मात्र सुरेश काळे हा फरार होता.
-
आरोपीचा मुलगा अद्याप फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
-
पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपाधीक्षक सूर्यकांत बांगर, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन बनकर आणि पोलीस उपनिरीक्षक सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.
-
या यशस्वी कारवाईसाठी तपास पथकातील सहाय्यक फौजदार संतोष उफाडे पाटील, धनंजय नाईक, शैलेश पाटील, राज बच्चाव आणि पोलीस शिपाई सुभाष काळे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
-
नाशिक रोड रेल्वे पोलिसांच्या या यशस्वी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
