जळगाव, 13 जानेवारी (हिं.स.) : जळगावात वाळू तस्करांची मुजोरी वाढली असून कारवाईसाठी गेलेल्या एरंडोल प्रांताधिकाऱ्याना खाली पाडून त्यांचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना धक्कदायक प्रकार घडला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील कासोदा पोलीस ठाणपासून अवघ्या 17 किलोमीटरवरील उत्राण येथील गिरणा नदीपात्रात मध्यरात्रीनंतर साडेबाराच्या सुमारास एरंडोल येथील उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड यांच्या नेतृत्वात उत्राणचे मंडळ अधिकारी प्रमोद मेघश्याम गायधनी, भालगावचे मंडळ अधिकारी दीपक ठोंबरे, तलाठी शेख शकील, निपाणीचे तलाठी विश्वंभर शिरसाठ, पोलीसपाटील प्रदीप तिवारी, महाजन आदींचे पथक उतरले. तेथे 8 ते 10 ट्रॅक्टर वाळू भरत असल्याचे दिसून आले. पथकाला पाहताच चालकांनी ट्रॅक्टर भरधाव घेत पलायन केले. मात्र, तेथो दोन ट्रॅक्टर थांबले होते. पथकाने मुसक्या आवळताच आणखी चार-पाच जण आले. त्यांना उपविभागीय अधिकारी गायकवाड, मंडळ अधिकारी गायधनी यांनी सरकारी कामात अडथळा आणू नका, असे बजावत आमचे काम करू द्या, असे सांगताच ट्रॅक्टरचालक आकाश राजेंद्र पाटील, अमोल, राहुल, दादाभाऊ, सागर (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) यांच्यासह 10-12 अज्ञात मारेकर्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पथकातील अधिकार्यांना पकडत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. उपविभागीय अधिकारी गायकवाड यांना जमिनीवर पाडून त्यांचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील कासोदा पोलीस ठाणपासून अवघ्या 17 किलोमीटरवरील उत्राण येथील गिरणा नदीपात्रात मध्यरात्रीनंतर साडेबाराच्या सुमारास एरंडोल येथील उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड यांच्या नेतृत्वात उत्राणचे मंडळ अधिकारी प्रमोद मेघश्याम गायधनी, भालगावचे मंडळ अधिकारी दीपक ठोंबरे, तलाठी शेख शकील, निपाणीचे तलाठी विश्वंभर शिरसाठ, पोलीसपाटील प्रदीप तिवारी, महाजन आदींचे पथक उतरले. तेथे 8 ते 10 ट्रॅक्टर वाळू भरत असल्याचे दिसून आले. पथकाला पाहताच चालकांनी ट्रॅक्टर भरधाव घेत पलायन केले. मात्र, तेथो दोन ट्रॅक्टर थांबले होते. पथकाने मुसक्या आवळताच आणखी चार-पाच जण आले. त्यांना उपविभागीय अधिकारी गायकवाड, मंडळ अधिकारी गायधनी यांनी सरकारी कामात अडथळा आणू नका, असे बजावत आमचे काम करू द्या, असे सांगताच ट्रॅक्टरचालक आकाश राजेंद्र पाटील, अमोल, राहुल, दादाभाऊ, सागर (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) यांच्यासह 10-12 अज्ञात मारेकर्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पथकातील अधिकार्यांना पकडत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. उपविभागीय अधिकारी गायकवाड यांना जमिनीवर पाडून त्यांचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
हिंदुस्थान समाचार
