गोंदिया २१ ऑक्टोंबर : गोंदिया शहराच्या सिंधी कालोनी भागातील एका घराच्या स्लॅबवर चोरी करण्याच्या उद्देशाने चढलेल्या इसमाला परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. सिंधी कालोनी भागात राहणारे पंकज वाधवाणी हे घरी नसल्याने संधीचा फायदा घेत उडीसा राज्यातून चोरी करण्याच्या उद्देशाने गोंदिया शहरात आलेला इसमाने पंकज वाधवाणी यांच्या घराच्या स्लॅबवर मागून प्रवेश केला असता परिसरातील नागरिकांनी आरोपीला पकडून गोंदिया पोलिसांच्या स्वाधीन केले आहे तर आरोपी इसम हा मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्याला स्वतःचे नाव देखील सांगता येत नसल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून गोंदिया पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.
