भंडारा ०४ फेब्रुवारी : भंडारा जिल्ह्यात अवैध धंद्यांना उत आला आहे. तुमसर तालुक्यात मोहफुल दारूचा महापूर आला आहे. तुमसर पोलिस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या तुडका गावा शेजारी असलेल्या तलावाच्या पाळीवर बिंधास्त दिवसाढवळ्या हातभट्टी सुरू आहे. याची माहिती तुमसर पोलिसांना माहिती असूनदेखील कडक कारवाई केली जात नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे. इतकचं नाही तर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध हातभट्टी सुरू असल्याने पोलीस बघ्याची भुमिका घेतांना दिसत आहेत.
