जळगाव, 15 जानेवारी (हिं.स.) क्रिकेटच्या फायनल मध्ये हार पत्कारावी लागली याचा राग मनात धरून मुंबई येथे पोलिस दलात कार्यरत आणि चाळीसगांव शहरातील पाटणादेवी रोड परिसरात रहिवासी असलेल्या पोलिस तरूणाचा तीक्ष्ण हत्यारांनी खून झाल्याची घटना बामोशी बाबा दर्गा समोरील पाटणा रस्ता कमानीजवळ भर रहादरीच्या रस्त्यावर घडली. यामुळे शहरात एकच खळबळ उडली. घटनास्थळावरून तिघांना ताब्यात घेतले तर अन्य पळून गेले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. आज संतप्त झालेल्या समाजबांधवांनी आरोपीना तात्काळ शिक्षेसाठी शहरात रास्ता रोको केले. आंदोलनानतंर मयत तरुणावर पोलिसांच्या बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले.
याबाबत शहर पोलिस स्टेशनला आनंद शिवाजी आगोणे याने दिलेल्या फिर्यादीनुसार १४ जानेवारी रोजी भडगांव रोड टाकळी प्र.चा.गावात जलाराम मार्बल दुकाना जवळील मैदानावर क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेत मित्रा एटंरप्राईजेस क्रिकेट संघ आणि एसके ग्रुप या संघादरम्यान सेमी फायनलचा सामना झाला. हा सामना मयत शुभम आगोणे याच्या संघाने जिंकला, तर सौरभ कोळी व सिध्दांत कोळी यांचा एसके ग्रुप हा पराभूत झाला. यावेळी विजयी संघ मैदानाबाहेर आला असता पराभूत संघातील सौरभ कोळी व सिध्दांत कोळी आणि संघाच्या इतर खेळाडूंनी विजयी मित्रा संघाच्या खेळाडूंशी वाद घालून शिवीगाळ केली. यावेळी वसंत बच्छाव याने चाकू काढून मारण्याची धमकी दिली. हा वाद शुभम आगोणे याने समजूत घालून मिटविला. घाट रोडने घराकडे जात असतांना अण्णा चिंधा कोळी यांच्या ऑफिस मध्ये बसलेल्या सौरभ कोळी , सिध्दांत कोळी, वसंत बच्छाव, पृथ्वी कुमावत व इतर साथीदारांनी आमच्या दिशेने दगड फेकले मात्र आम्ही तेथे न थांबता पीर मुसा कादरी जवळील कमानीजवळ येऊन थांबले असतांना अहिल्यादेवी चौकाकडून सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एक रिक्षा आणि काही मोटारसायकलवर सौरभ कोळी, सिध्दांत कोळी व त्यांचे साथीदार तेथे आले. त्यांनी हातातील तीक्ष्ण हत्यारांनी शुभम आगोणेवर हल्ला चढवला. शुभमला मारहाण होत असतांनाच वरील संशियतांनी आनंद शिवाजी आगोणे व रोहित बोराडे यांच्यावर देखील हल्ला झाल्याने तेदेखील जखमी झाले. या हल्लयात शुभमला रूग्णालयात दाखल केल्यानंतर मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तर वरील दोघी जख्मी खाजगी रूग्णालयात उपचार घेत आहे.
याप्रकरणी शहर पोलिसात रात्री गु.र.नं.२४/२०२४ कलम भादंवि कलम ३०२,३०७, ३२४,५०४, ५०६,१४३,१४४ १४७ ,१४८,१४९,३७(१)३७(३) १३५,४, २५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळावर महिलेसह तीन आरेापींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हिंदुस्थान समाचार
