पुणे, 30 नोव्हेंबर, (हिं.स) नऱ्हे धायरी हद्दीतील अंबामाता मंदिराजवळ परफेक्ट ऑटो गॅरेज येथे १० वाहनांना आग लाग लावण्यात आली. अग्निशामक दलाकडून आग आटोक्यात आणण्यात आली. जमिनीच्या वादातून मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास हा हिंसक प्रकार केला गेला.या घटनेत कोणी जखमी झाले नसल्याची माहिती सिंहगड पोलिसांनी दिली. या आगीत ४ चारचाकी वाहनांपैकी १ पूर्ण जळाली. ती समीर पोकळे याच्या मालकीची चारचाकी गाडी आहे. ६ दुचाकी जळून खाक झाल्या.६ चारचाकी वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. या प्रकरणी नितीन रणझुंजार व त्याचे दोन साथीदार हर्षद खोमणे व किरण खिलारे यांच्यावर सिंहगड रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अंबाईदरा सिध्दी चौक अंबाईमाता मंदीराजवळ येथील परफेक्ट ऑटोहब नावाचे दुचाकी व चारचाकी वाहनांचे गॅरेज आहे.
हिंदुस्थान समाचार
