नाशिक, 10 जुलै, (हिं.स.)। शहरातील फर्नांडिस वाडी येथे दोन गटाच्या वर्चस्वाच्या वादामध्ये गोळीबार झाला असून एका वकिलाच्या घरावरती देखील हल्ला करण्यात आला आहे. यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता पोलिसांनी याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक रोड परिसरामध्ये असलेल्या फर्नांडिस वाडी येथे तू आमच्या हद्दीमध्ये का आला या वादातून रोहित डिगम आणि राहुल जगवाल या दोघांमध्ये मागील काही दिवसापासून वात चालू होता पण बुधवारी रात्री हे दोघेही आपल्या टोळीतील कार्यकर्त्यांसह या ठिकाणी एकत्र आले त्यातून दोघांमध्ये वाद सुरू झाले आणि त्या वादातून कोणीही माघार घेत नसल्याने एकमेकांवरती हाणामारी करण्याचा प्रकार देखील घडला हा प्रकार हाताबाहेर जात असताना अचानक रोहित डिंगम आणि राहुल जगवाल या दोघांनी देखील एकमेका वरती बंदुका रोखल्या आणि त्यातून पाच राऊंड फायर केले . तणाव वाढल्यामुळे परिसरातील नागरिकांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली आणि पोलीस घटनास्थळी गेले त्या ठिकाणी पोलिसांना पाच राऊंड बंदुकीच्या फायरचे झाल्याची मिळाली असून या परिसरामध्ये राहणाऱ्या एका महिला वकिलाच्या घरावर दगड आणि काचांचा मारा करून घराचे नुकसान केल्याची देखील समोर आले आहे.
याबाबत परिमंडळ दोनच्या उपयुक्त मोनिका राऊत यांनी सांगितले की संबंधित वकील महिला ही रोहित डिंगम यांच्या बाबत न्यायालयात काम करत होती त्यातूनच तिच्या घरी हल्ला झाला आहे तर या सर्व प्रकरणांमध्ये पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे अधिक तपास उपनगर पोलीस करीत आहेत.
—————
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI
