डोंबिवली, ०२ नोव्हेंबर, (हिं.स.) : भाच्याने घरातील सोन्याचे मंगळसूत्र चोरल्याची तक्रार त्याच्या आत्याने विष्णुनगर पोलीस ठाण्यात केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिपक धनीराम प्रजापती (२४ , रा, रूम नंबर ७३३, नंदनपुरा, सिपी बाजार, जी.डी. मिशन स्कुल जवळ, झांसी, उत्तर प्रदेश ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या भाच्याचे नाव आहे. त्याची आत्या खुशनम प्रेमचंद चक्रवती यांनी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादिवरून पोलीस ठाण्यात भाच्याविरोधात तक्रार दाखल आहे. खुशनम या डोंबिवली पश्चिमेकडील शास्त्रीनगर रुग्णालयासमोर सुदाम म्हात्रे बिल्डीगमध्ये राहतात. दीपक हा आत्या खुशनम यांच्या घरी येत-जात होता. खुशनम यांच्या घरी ३१ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेले होते. भाच्यानेच घरात चोरी केल्याचा आरोप खुशनम यांनी केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आंधळे करीत आहेत.
हिंदुस्थान समाचार
