पुणे, 5 जानेवारी (हिं.स.) येथील कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर गोळीबार करण्यात आला आहे. कोथरूड परिसरातील सुतारदरा या ठिकाणी शरद मोहोळ जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात आरोपींनी शरद मोहोळ यांच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी त्याच्या खांद्याला लागली.
गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळवर कोथरूड परिसरातीलच एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज, शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला आहे. गोळ्या झाल्यानंतर आरोपी पसार झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील तपास सुरू आहे.
हिंदुस्थान समाचार
