अमरावती, 3 नोव्हेंबर (हिं.स.) : तालुक्यातील सोनोरी येथील ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमणाचा प्रश्न चांगलाच गाजला. तक्रारी,विहिरीत केलेल्या उपोषणाची दखल घेत जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशावरुन व पंचायत समीती प्रशासनाने ग्राम पंचायत उपसरपंच,सचिव व पाच सदस्यांच्या उपस्थितीत पोलीस बंदोबस्तात १७ सप्टेंबर २०२३ रोजी वादग्रस्त अतिक्रमण काढले.त्याला दीड महिन्याचा कालावधी झाला.मात्र पुन्हा त्याच ठिकाणी बांधकाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला.या मुद्यावरुन दोन्ही गट अमोरासमोर उभे ठाकल्याने त्यांच्यात हाणामारी झाली.यात एकूण चौघे जण जखमी झाले.परस्पराविरुध्द तक्रारीवरुन दोन्ही गटातील एकुण आठ जणाविरुध्द ब्राम्हणवाडा थडी पोलीसात गुन्हे दाखल करण्यात आले.अक्षय उध्दव चर्जन यांच्या तक्रारीवरुन संशयित अरुण महादेव मडघे,संजय अरुण मडघे,मोहन अरुण मडघे,अशा तिघाविरुध्द तर दुसर्या गटाच्या मोहन मडघे यांच्या तक्रारीवरुन संशयित विलास दत्तुजी चर्जन,शरद रंगराव चर्जन,देवानंद उध्दव चर्जन,अक्षय उध्दव चर्जन,सुरज दादाराव चर्जन अशा पाच जणाविरुध्द ब्राम्हणवाडा थडी पोलीसांनी गुन्हा दाखल केला.
हिंदुस्थान समाचार
