cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Business > अॅक्सिस बँकेकडून ‘विमेन्स स्मॉल बिझनेस बँकिंग’ सुविधेचा शुभारंभ
Business

अॅक्सिस बँकेकडून ‘विमेन्स स्मॉल बिझनेस बँकिंग’ सुविधेचा शुभारंभ

CliQ INDIA
Last updated: March 19, 2026 6:32 am
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE

मुंबई, 18 मार्च (हिं.स.)। अॅक्सिस बँक या भारतातील अग्रगण्य खासगी क्षेत्रातील बँकेने महिला उद्योजकांना सक्षम करण्याच्या उद्देशाने ‘विमेन्‍स स्मॉल बिझनेस बँकिंग (एसबीबी)’ हा विशेष उपक्रम सुरू केल्याची घोषणा केली आहे. महिला-नेतृत्वांतर्गत उद्योगांना परवडणाऱ्या आणि सुव्‍यवस्थित आर्थिक सुविधा सहज उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

या सुविधेमध्ये कर्जपुरवठा, सर्वसमावेशक बँकिंग सेवा आणि चालू खात्याशी संबंधित विविध लाभांचा समावेश करण्यात आला आहे. याद्वारे महिला उद्योजकांना त्यांच्या व्यवसायाची वाढ आणि स्थिरतेसाठी पूरक असा एकात्मिक बँकिंग अनुभव मिळणार आहे.

या उपक्रमांतर्गत महिला-नेतृत्वाखालील एमएसएमई उद्योगांना सवलतीच्या दरात बँकिंग सुविधा मिळू शकतील. यामध्ये तारणाधारित तसेच क्रेडिट गॅरंटी अंतर्गत मिळणाऱ्या कर्जांवरील व्याजदरात संभाव्य सवलतींचा समावेश आहे. दैनंदिन व्यावसायिक व्यवहार आणि रोख रकमेचे व्यवस्थापन सुलभ व्हावे, यासाठी चालू खात्यावर ठराविक विशेष फायदे दिले जातील. या माध्यमातून परवडणाऱ्या कर्जसुविधांची व्याप्ती वाढवून महिला उद्योजकांना त्यांचा व्यवसाय विस्तारण्यासाठी मदत करण्याचा बँकेचा प्रयत्न आहे.

‘विमेन्‍स स्मॉल बिझनेस बँकिंग’ ही सुविधा वैयक्तिक मालकी, भागीदारी, एलएलपी आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या अशा विविध व्यवसाय प्रकारांसाठी उपलब्ध आहे. कर्जाच्या संपूर्ण कालावधीत हे लाभ लागू राहतील आणि अॅक्सिस बँकेच्या शाखांमधील ‘स्मॉल बिझनेस बँकिंग’ (एसबीबी) टीममार्फत या सेवा पुरवल्या जातील.

या उपक्रमाबाबत मत व्‍यक्त करत अॅक्सिस बँकेच्या कमर्शियल बँकिंग ग्रुपचे प्रेसिडेंट & हेड विजय शेट्टी म्हणाले, “महिला-नेतृत्वाखालील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) हे भारताच्या आर्थिक प्रगतीचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. उद्यम प्लॅटफॉर्मवर ३ कोटींहून अधिक महिला-नेतृत्वाखालील एमएसएमई उद्योगांची नोंदणी असून ते उद्योजकता, रोजगार आणि नवनिर्मितीमध्ये मोठे योगदान देत आहेत. भारत जसा बहु-ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे, तसे या उद्योगांना संरचित आर्थिक सुविधा उपलब्ध करून दिल्यास मोठे आर्थिक मूल्य निर्माण होईल आणि सर्वसमावेशक विकासाला गती मिळेल.

या ‘विमेन्स स्मॉल बिझनेस बँकिंग’ सुविधेच्या माध्यमातून, अॅक्सिस बँकेचा उत्तम कार्यप्रणाली तयार करण्‍याचा मनसुबा आहे, जी आर्थिक सुलभता वाढवेल, आर्थिक उपलब्धता अधिक दृढ करेल आणि महिला उद्योजकांना आत्मविश्वासाने त्यांचे उद्योग वाढवण्यासाठी व ते स्थिरपणे चालवण्यासाठी सक्षम करेल.”

या शुभारंभाद्वारे, अॅक्सिस बँक सर्वसमावेशक उद्योजकतेला बळ देण्याच्या आणि महिलांच्या नेतृत्वाखालील एमएसएमईंना पाठबळ देण्याच्या आपल्या वचनबद्धतेला दृढ करत आहे. दीर्घकालीन व्यवसाय विकास आणि स्थिरता लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या सवलतीच्या आर्थिक उपायांद्वारे ही मदत केली जाईल.

—————

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर

You Might Also Like

डेंग्यू-मलेरिया वर्षभराचा धोका; गुडनाइट सर्वेक्षणातून निष्कर्ष
मेटाने पाच नव्या भारतीय भाषांचा सपोर्ट केला जाहीर
चांदीने गाठला ऐतिहासिक उच्चांक – Hindusthan Samachar Marathi
एअर इंडियाच्या तिकीट दरात होणार वाढ; नवीन दर ८ एप्रिलपासून होतील लागू
शासनाच्या योजना यशस्वी करण्यासाठी खाजगी उद्योग क्षेत्राने पुढे यावे – उदय सामंत

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article जळगाव : मुद्रांक विक्रेत्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
Next Article मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?