मुंबई, 3 फेब्रुवारी : प्रोटिनेक्स या डॅनवन इंडियाच्या प्रमुख ब्रँडने ‘प्रोटिनेक्स, स्ट्रेंथ अपने लिए, अपनों के लिए’ ही नवी जाहिरात लाँच केली आहे. दैनंदिन कामं आणि जबाबदाऱ्या पार पाडताना ताकद किती महत्त्वाची आहे हे या जाहिरातीतून ठसवण्यात येणार आहे. या जाहिरातीमध्ये वैयक्तिक स्वास्थ्याबरोबरच ताकद आवश्यक असून ती आपल्या कुटुंबाच्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्यासाठीही जास्त महत्त्वाची आहे हे सांगण्यात येणार आहे. ही जाहिरात प्रोटिनेक्सच्या रिलाँचशी सुसंगत असून त्याद्वारे भारतातील नागरिकांना आरोग्यदायी उत्पादने निवडण्यासाठी तसेच त्यांना आपल्या एकूण स्वास्थ्याविषयी जागरूक करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.
या जाहिरातीमध्ये नमिता दुबे आणि नंदीश सिंग संधू हे कलाकार घराची नव्यानं सजावट करणाऱ्या जोडप्याची भूमिका करताना दिसतील. मुलीचे पालक त्यांच्याबरोबर राहायला येणार असल्यामुळे ते घराची रचना बदलत असतात. नवऱ्याचा उत्साह आणि कामातला सक्रिय सहभाग पारंपरिक मानसिकता बदलत असल्याचे, पती- पत्नीचे नाते समानता व कामं समप्रमाणात वाटून घेण्यावर आधारित असते हे अधोरेखित करते. पतीच्या विचारांतले वेगळेपण त्यानं पत्नीला दिलेल्या भेटवस्तूतून आणखी उलगडतं. दरवाजावरच्या पाटीवर ‘आई, बाबा, प्रिया, रोहन’ असं लिहिलेलं आपल्याला दिसतं आणि पत्नीच्या पालकांचा घरात आपलेपणानं समावेश करण्यात आल्याचं अधोरेखित होतं. दोघे जोडीदार मग, प्रोटिनेक्सचा आस्वाद घेताना दिसतात आणि ‘प्रोटिनेक्स, स्ट्रेंथ के लिए, अपनों के लिए’ ही टॅगलाइन ठळक होते. यावरून कंपनी केवळ वैयक्तिक ताकदीवरच नव्हे, तर अर्थपूर्ण नात्यांतून मिळणाऱ्या ताकदीवर भर देत असल्याचे दिसून येते. प्रोटिनेक्स खास तयार करण्यात आले असून त्यात प्रोटिन, कॅल्शियम, इतर आवश्यक पोषणमूल्ये यांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे आठ आठवड्यांत ताकद वाढण्यास मदत होते.
या जाहिरातीविषयी डॅनवन इंडियाच्या मार्केटिंग विभागाचे संचालक श्रीराम पद्मनाभन म्हणाले, ‘सातत्याने विकसित होत असलेल्या जगात आमचा ब्रँडही ग्राहकांच्या बदलत्या गरजा व महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी विकसित होत आहे. या जाहिरातीच्या माध्यमातून आम्ही उत्पादनाचा प्रसार करण्याबरोबरच ताकद ही समग्र असते आणि त्यात मानसिक, शारीरिक तसेच नात्यांच्या स्वास्थ्याचा समावेश असतो हे दाखवणार आहोत. प्रोटिनेक्सने वैयक्तिक ताकदीबरोबरच प्रियजनांची ताकद उंचावण्यावर भर देण्याचे ठरवले आहे. या जाहिरातीतून आयुष्याच्या प्रत्येक पैलूमध्ये आरोग्य व स्वास्थ्याचे महत्त्व इतरांपर्यंत पोहोचवण्याची आमची बांधिलकी दिसून येत आहे.’
खाद्यपदार्थांतून जास्तीत जास्त लोकांना आरोग्य मिळवण्यासाठी मदत करण्याचे ध्येय डॅनवनने ठेवले असून नवी जाहिरात त्याच्याशी सुसंगत आहे. सर्वसमावेशक पोषण आणि ताकद हवी असणाऱ्यांसाठी हे उत्पादन आदर्श असून त्यामुळे देशभरातील नागरिकांचे आरोग्य व स्वास्थ्य उंचावण्यास मदत होईल.
ही जाहिरात प्रामुख्याने टीव्ही चॅनेल्स आणि विविध डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर प्रसारित केली जाणार असून त्यात प्रोटिनेक्सचे युट्यूब चॅनेल आणि सोशल असेट्सचाही समावेश असेल.
