मुंबई, 3 फेब्रुवारी (हिं.स.) : ओला इलेक्ट्रिक कंपनीने पुढील तिमाहीपर्यंत १० हजार जलद चार्जिंग सेंटर वाढवण्याची योजना जाहीर केली. कंपनीने ३ किलो व्हॉटची पोर्टेबल फास्ट चार्जर ऍक्सेसरी देखील सादर केली आहे आणि ती अल्प किमतीत उपलब्ध करून दिली आहे. तसेच ओला इलेक्ट्रिकने आज शक्तिशाली ६ किलो व्हॉट मोटर आणि १९० किमीच्या लांब पल्ल्याची एसवन एक्स ४के डब्ल्यू एच लॉन्च केली आहे. या मोटारसायकलची किंमत १ लाख ९ हजार ९९९ रुपये आहे आणि याचे वितरण एप्रिल २०२४ पासून सुरू होणार आहे. कंपनीने आपल्या सर्व उत्पादनांमध्ये ८ वर्षांची किंवा ८० हजार किमी पर्यंतची विस्तारित बॅटरी वॉरंटी देखील जाहीर केली आहे.
याबाबत ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे संस्थापक, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक भावीश अग्रवाल म्हणाले की, “उत्पादने, सेवा, चार्जिंग नेटवर्क आणि बॅटरी वॉरंटी या सर्वांमध्ये पसरलेले आमचे नवीनतम उपक्रम देशभरातील ईव्ही अवलंबनातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी एक मोठी झेप आहे. संपूर्णतः नवीन एसवन एक्स ४के डब्ल्यू एच ही अत्यंत आकर्षक आहे ज्याची विस्तारित श्रेणी १९० किलोमीटरच्या अत्यंत सुलभ प्राईस पॉईंट आहे. आमची 8 वर्षांची विस्तारित बॅटरी वॉरंटी कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय आणि आमच्या सेवेचा विस्तार आणि भारतभर चार्जिंग नेटवर्कसह ईव्ही उद्योगात एक नवीन बेंचमार्क स्थापित करेल आणि आमच्या सर्व ग्राहकांचा अनुभव वाढवेल. या उपक्रमांद्वारे, आम्हाला खात्री आहे की यामुळे देशभरातील ईव्हीचा प्रसार व्हायला आणखी गती मिळेल.” असेही यावेळी अग्रवाल यांनी स्पष्ट केले.
हिंदुस्थान समाचार
