मुंबई, 12 ऑक्टोबर बाजारपेठेतील उलाढाल (कन्झ्युमरिझम) वेगाने वाढत असून त्यामुळे साखळी पुरवठा धोरण व पद्धतींमध्ये नाविन्याची तीव्र गरज निर्माण झाली आहे. आज विविध बाजारपेठांपुढे असलेल्या आव्हानांवर मात करण्यासाठी प्रत्येक जण ऑटोमेशन तंत्रज्ञानाकडे आधार म्हणून पाहात आहे. गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी गोदरेज अँड बॉयसचे व्यावसायिक युनिट असलेली गोदरेज स्टोअरेज सोल्यूशन्स स्टोअरेज यंत्रणा क्षेत्रात आघाडीवर आहे. कंपनीचे ५० टक्के उत्पन्न रिटेल/ईकॉम/एफएमसीजी/एफअँडबी व ग्राहकोपयोगी उत्पादन यांसारख्या ग्राहकावर अवलंबून असलेल्या उद्योगांतून येते.
ही गरज लक्षात घेत घेऊन कंपनी वेयरहाउसिंग यंत्रणेसाठी अत्याधुनिक सुविधा तयार करत आहे. त्यामध्ये माल स्वीकारण्यापासून पाठवण्यापर्यंतच्या कामांसाठी तयार केल्या जात असलेल्या सुविधांचा समावेश आहे. गोदरेज स्टोअरेज सोल्यूशन्सने सुविधा आणि अमलबजावणीसाठी मनुष्यबळ, तंत्रज्ञान तसेच साखळी पुरवठा भागिदारांच्या माध्यमातून आवश्यक यंत्रणांचे एकत्रीकरण अशा बाबींमध्ये लक्षणीय गुंतवणूक केली आहे. कामकाजातील कार्यक्षमता तसेच उत्पादनक्षमता वाढवून आणि उच्च दर्जा राखत ग्राहकाला जास्त चांगले परतावे मिळवून देण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
नव्या तंत्रज्ञानाविषयी गोदरेज स्टोअरेज सोल्यूशन्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख विकास चौदाहा म्हणाले, ‘इंट्रालॉजिस्टिक्स क्षेत्रात ऑटोमेशनची क्षमता आणि शक्यता खूप मोठी आहे. त्याचा साध्या कन्व्हेयर यंत्रणेपासून कोबोट्स आणि एआय/एमएलवर आधारित तंत्रज्ञानापर्यंत विविध ठिकाणी अवलंब करता येऊ शकतो. इंट्रालॉजिस्टिक्स क्षेत्रात अशा प्रकारच्या यंत्रणा किंवा तंत्रज्ञानात गुंतवणूक करणाऱ्या आणि त्यांचा अवलंब करणाऱ्या कंपन्यांचे प्रमाण वाढताना दिसेल, कारण त्यांनाही याचे फायदे लक्षात येत आहेत. त्यात वाढलेल्या कार्यक्षमतेपासून उत्पादनता, अचूकता, खर्चात बचत अशा दीर्घकालीन लाभांचाही समावेश आहे. यामुळे आपल्या देशाचा लॉजिस्टिक्सचा खर्च सध्या जीडीपीच्या १३-१४ टक्क्यांवरून खाली येईल. गोदरेज स्टोअरेज सोल्यूशन्स आपल्या ग्राहकांना वाजवी किंमतीत कार्यक्षम वेयरहाउस सुविधा पुरवण्यासाठी वचनबद्ध आहे.’
मोठ्या कामकाजासाठी वेयरहाउसेस मोठी आणि उंच होत असतानाच त्यात कामकाजाचे सफाईदारपणे एकत्रीकरण करणे आवश्यक झाले आहे. पॉइंट-टु-पॉइंट ट्रान्सफर, स्टँडर्डाइज्ड पॅक्सचे लोडिंग आणि अनलोडिंग अशा वारंवार कराव्या लागणाऱ्या कामांमध्ये ऑटोमेशन आणणे, त्यात बॅटरीवर ऑपरेटेड पॅलेट ट्रक्स (एबीओपीटीज), एएमआर, रोबोटिक पॅलेटायझर्स आणि पॅकिंग मशिन्सचा वापर करणे महत्त्वाचे झाले आहे. माल ओळखण्यासाठी बार कोड स्कॅनर्स व रीडर्सचा समावेश करून मानवी हस्तक्षेप टाळता येऊ शकतो. प्रत्येक एसकेयूची पूर्ण दृश्यमानता आणि त्याचा माग घेण्याची शक्यता डब्ल्यूएमएस आणि ईआरपी यंत्रणेमुळे शक्य झाली आहे, तर रियल टाइम डेटा गॅदरिंग, विश्लेषण, निर्णय घेणे इत्यादी बाबी आयओटी आणि क्लाउड कम्प्युटिंगमुळे शक्य झाल्या आहेत. अशाप्रकारचे ऑटोमेशन आणि डिजिटायझेशनच्या मदतीने काम जास्त अचूक आणि वेगाने होत असल्यामुळे उत्पादनक्षमता आणखी वाढते.
इंट्रालॉजिस्टिक्स ऑटोमेट करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे विविध लाभ असून त्यांचा सद्य वेयरहाउसेस/वर्कफ्लोमध्ये समावेश करण्याची गरज असते. त्यासाठीच गोदरेज स्टोअरेज सोल्यूशन्स ग्राहकाच्या वेयरहाउसिंगशी संबंधित सद्य व भविष्यकालीन गरजा बारकाईने समजून घेते व त्यानुसार सहजपणे वापरता येण्यासारखी उपाययोजना तयार करते. हे विविध क्षेत्रांतील वेयरहाउसिंगचे सखोल ज्ञान, त्या क्षेत्रांतील आधुनिक तंत्रज्ञान आणि या सर्वांचा मेळ घालण्याची क्षमता यांमुळे शक्य होते.
