cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Business > केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘कस्तूरी कॉटन भारत’ संकेतस्थळाचे उद्घाटन
Business

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘कस्तूरी कॉटन भारत’ संकेतस्थळाचे उद्घाटन

CliQ INDIA
Last updated: October 22, 2023 12:32 pm
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर : केंद्रीय वस्त्रोद्योग, वाणिज्य आणि उद्योग तसेच अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांनी आज कस्तूरी कॉटन भारत या कापसाच्या ब्रॅंडच्या विशेष संकेतस्थळाचे https://kasturicotton.texprocil.org उद्घाटन केले. या संकेतस्थळावर, या उप्रकमाविषयीची सगळी महत्वाची आणि अद्ययावत माहिती मिळू शकेल. त्याशिवाय, जिनिंग व्यावसायिकांसाठीची कस्तूरी कापूस उत्पादन विषयक नोंदणी प्रक्रिया आणि या कापसाला विशेष भारतीय ब्रॅंड बनवणाऱ्या इतर सर्व प्रक्रियांची माहिती मिळू शकेल.

कस्तूरी कॉटन भारत, हा, वस्त्रोद्योग मंत्रालय, भारतीय कापूस महामंडळ, व्यापार संस्था आणि उद्योग यांचा एक संयुक्त उपक्रम आहे, जो जागतिक बाजारपेठेत भारतीय कापसाची स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी आणि त्यात सहभागी असलेल्या सर्व भागधारकांसाठी शाश्वत व्यवस्था तयार करण्यासाठी ब्रँडिंग, व्यावसायिक माग घेणे आणि भारतीय कापसाच्या प्रमाणीकरणाची जबाबदारी घेऊन स्वयं-नियमनाच्या तत्त्वावर काम करतो.

याआधी, 7 ऑक्टोबर रोजी, जागतिक कापूस दिनाच्या पूर्वसंध्येला, वस्त्रोद्योग मंत्रालयाने “कस्तुरी कॉटन ब्रॅंड” ह्या भारतीय कापसाच्या विशेष ब्रॅंडची घोषणा केली होती. यासाठी एक विशेष लोगो देखील प्रसिद्ध करण्यात आला असून, हा लोगो, कस्तुरी कापसाची वैशिष्ट्ये, त्याची शुभ्रता, मुलायम पोत, त्याची शुद्धता, चमक आणि भारतीयत्व व्यक्त करतो. त्यानंतर, केंद्र सरकारच्या वतीने सीसीआय आणि वस्त्रोद्योग उद्योगांच्या टेक्सोप्रोकिल (TEXPROCIL) यांच्यात, 15 डिसेंबर 2022 रोजी एक सामंजस्य करार करण्यात आला. ज्याद्वारे, कस्तुरी कॉटन भारत ब्रॅंड चे विशेष स्थान निर्माण करण्यासाठी मिशन मोड वर काम करण्याचा दृष्टीकोन निश्चित करण्यात आला.

देशातील सर्व विक्रेत्यांना, निश्चित प्रोटोकॉलनुसार कस्तुरी कॉटन भारत ब्रँडचे उत्पादन करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. याशिवाय, संपूर्ण पुरवठा साखळीमध्ये कस्तुरी कॉटन भारतची संपूर्ण साखळी प्रदान करण्यासाठी, प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर QR आधारित प्रमाणपत्र तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल आणि ब्लॉकचेन आधारित सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म, एंड टू एंड ट्रेसेबिलिटी म्हणजे उत्पादनाचा, सुरुवातीपासून शेवटपर्यंतचा प्रवास, आणि व्यवहार प्रमाणपत्र प्रदान करेल.

कस्तुरी कॉटन भारत उपक्रमाद्वारे आम्ही केवळ एक ब्रँड सुरू करत नाही, तर भारताचा समृद्ध वारसा जगासमोर आणत आहोत. आपल्या भूतकाळाशी धागे जोडणारा एक भविष्यकाळ आपण घडवूया, असे वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यावेळी म्हणाले. जागतिक स्पर्धेच्या युगात, हा उपक्रम भारतीय कापसाला त्याच्या गुणवत्ता मानकांमुळे आणि सर्वोत्तम पद्धतींप्रतीच्या वचनबद्धतेमुळे जागतिक नकाशावर महत्वाचे स्थान मिळवून देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

You Might Also Like

आजपासून लागू झाले नवे आर्थिक निर्णय; कर, बँकिंग, टपाल व विमान वाहतूक क्षेत्रात महत्त्वाचे बदल
‘महिंद्राच्या’ ‘फ्युचर-रेडी’ इंडिया डिझाईन स्टुडिओचे अनावरण | BulletsIn
वॉबल वन स्मार्टफोन भारतात लॉंच
हायनेस मायक्रो इलेक्ट्रॉनिक्सचा आयपीओ वर्गणीसाठी खुला; २ एप्रिल रोजी लिस्टिंग होण्याची शक्यता
‘गोदरेज’च्या ‘वेस्ट हीट रिकव्हरी सिस्टीम’मुळे दररोज १७०० केडब्ल्यूएच इतकी उर्जेची बचत

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article तुमसरमधील चांदमारा वाळू घाटावर कारवाई, 2 जेसीबी, 6 ट्रक जप्त
Next Article सोयाबीन उत्पादकता पन्नास टक्क्यांहून कमी
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?