cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Business > व्होल्टासने देशभरात सुरू केली १० नवीन ब्रँड स्टोर्स
Business

व्होल्टासने देशभरात सुरू केली १० नवीन ब्रँड स्टोर्स

CliQ INDIA
Last updated: November 19, 2023 12:30 pm
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE

मुंबई, १९ नोव्हेंबर, (हिं. स) भारतातील नंबर १ एसी कंपनी आणि टाटा समूहातील एक सदस्य, व्होल्टास लिमिटेडने भारतभरातील विविध शहरांमध्ये १० नवीन ब्रँड स्टोर्स सुरु करण्यात आल्याची घोषणा केली आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये व्होल्टासने इंदोर, कोलकाता, ठाणे, भुवनेश्वर, अहमदाबाद, लखनौ, चंदीगढ आणि गाझियाबादच्या ग्राहकांसाठी आपली ब्रँड स्टोर्स सुरु करून द्वितीय श्रेणी शहरांमध्ये आपले स्थान अजून जास्त मजबूत केले आहे. नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्याच्या आणि उच्च दर्जाच्या अप्लायन्सेसच्या विशाल श्रेणीसोबत आपल्या ग्राहकांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्याच्या धोरणांतर्गत कंपनीने हे महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. या नवीन ब्रँड स्टोर्समध्ये व्होल्टास आणि व्होल्टास बेको उत्पादनांची विशाल श्रेणी प्रदर्शित करण्यात आली आहे. यामध्ये एअर कंडिशनर्स, एअर प्युरिफायर्स, एअर कूलर्स, कमर्शियल रेफ्रिजरेटर्स, वॉटर हीटर्स, वॉटर डिस्पेन्सर्स, वॉटर कूलर्स, रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्स, मायक्रोवेव आणि डिशवॉशर यांचा समावेश आहे.

ही नवी ब्रँड स्टोर्स सुरु करून व्होल्टासने देशभरात एक्सक्लुसिव्ह ब्रँड स्टोर्सचे एक विशाल आणि मजबूत नेटवर्क स्थापन केले आहे. भारतभर पसरलेले आणि सतत वाढत असलेले एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट्सचे नेटवर्क व्होल्टाससाठी अभिमानाची बाब आहे. या विशाल नेटवर्कच्या माध्यमातून येत्या काळात आपली पोहोच वाढवण्यासाठी व्होल्टास बांधील आहे. व्होल्टासची वेगवान विस्तार योजना देशभरातील जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचून त्यांना आधुनिक व विश्वासार्ह उत्पादने सहजपणे उपलब्ध करवून देण्याची कंपनीची प्रतिबद्धता दर्शवते.

प्रमुख शहरांमध्ये आपली ब्रँड स्टोर्स सुरु करून व्होल्टास ग्राहकांना त्यांच्या गरजा पूर्ण करू शकतील अशी योग्य उत्पादने निवडण्यात व्यक्तिगत साहाय्य व तज्ञांचे मार्गदर्शन प्रदान करून त्यांच्यासोबत आपले नाते अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्नशील आहे. आधुनिक स्टोर लेआऊट असलेल्या या स्टोर्समध्ये ग्राहकांना खरेदीचा अतुलनीय अनुभव प्रदान केला जाईल. ब्रँडच्या विचारसरणीचे सार दर्शवणारा हा अनुभव याठिकाणी येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाच्या मनावर आपली छाप उमटवतो. परवडण्याजोग्या किमतींमध्ये नाविन्यपूर्ण उत्पादने प्रस्तुत करण्याची आपली बांधिलकी व्होल्टासने कायम राखली आहे.

व्होल्टास लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ श्री प्रदीप बक्षी यांनी सांगितले, भारतभर अजून अनेक शहरांमध्ये व्होल्टास उत्पादनांची सुविधा आणि नावीन्य प्रस्तुत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. या ब्रँड स्टोर्समध्ये आम्ही आपली नवीन उत्पादने सादर करून ग्राहकांना सर्वोत्तम सेवा अनुभव प्रदान करू शकू. या शहरांमधील ग्राहकांच्या गरजा व मागण्या पूर्ण करणे, आमच्या उत्पादन अनुभवांची पोहोच वाढवणे हे आमचे उद्दिष्ट आहे. ग्राहकांना अतुलनीय अनुभव प्रदान करण्याची आमची वचनबद्धता अतूट आहे. आमच्या ग्राहकांना त्यांच्या घरांसाठी योग्य उत्पादने निवडण्यात मदत करण्यासाठी व्यक्तिगत साहाय्य आणि तज्ञांचे मार्गदर्शन प्रदान करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आमच्या ग्राहकांच्या सणाच्या आनंदात सहभागी होऊन, त्यांचा आनंद व आराम यामध्ये वाढ करून आम्हाला खूप छान वाटले.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

एचडीएफसी सिक्युरिटीज इन्व्हेस्टिंग अॅपचा विस्तार
एडीबीचा अंदाज : २०२५-२६ मध्ये भारताचा विकास दर ६.५% राहील
ॲपलचे बाजारमूल्य पहिल्यांदाच ४ ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे
२०२३ या वर्षात जागतिक शेती उद्योगापुढे विविध आव्हाने निर्माण झाली – आशिष दोभाल
इलेक्ट्रो २०२६ : गोदरेज ठरले सर्वोत्कृष्ट स्टॉल पारितोषिकाचे मानकरी

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article भारतात हवाई प्रवास केवळ उच्चभ्रू लोकांची मक्तेदारी राहिलेली नाही – डॉ. जितेंद्र सिंह
Next Article म्हैसाळ योजनेच्या रब्बी आवर्तनाचा डॉ. सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत शुभारंभ
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?