मुंबई, 27 डिसेंबर (हिं.स.) ‘२०२३ या वर्षात जागतिक शेती उद्योगापुढे विविध आव्हाने निर्माण झाली. कच्च्या मालाच्या किंमतीतील चढ- उतार, कीडीचा प्रादुर्भाव आणि टोकाच्या हवामानामुळे अडचणी आणखी जटील झाल्या. अशी आव्हाने येऊनही या उद्योगाने विलक्षण चिकाटीने शेतीच्या शाश्वत पद्धतींचे महत्त्व दाखवून दिले. परिस्थिती प्रतिकुल असतानाही या पद्धती शाश्वतता आणि स्थैर्य टिकवून ठेवण्यात महत्त्वाच्या ठरल्या. त्याहीपेक्षा २०२३ मध्ये शेती क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यावर भर देत कशाप्रकारे नाविन्यपूर्ण तंत्राच्या मदतीने शेती करण्याच्या पद्धतीमध्ये क्रांती येऊ शकते आणि ते कशाप्रकारे भविष्यासाठी प्रभावी व शाश्वत ठरू शकते हे पाहायला मिळाले.
आर्थिक वर्ष २४ मध्ये शेती क्षेत्रात काही सकारात्मक बदल अमलात येतील अशी आशा असून या बदलांचा भर शाश्वत पद्धती, हवामानविषयक उपाययोजना आणि तंत्रज्ञानाचा समावेश यांवर असेल. युपीएलमध्ये आम्ही शेतकरी आणि खाद्य यंत्रणेसाठी ‘शाश्वततेचा पुनर्विचार’ या धोरणावर जास्त भर देणार आहोत. त्याशिवाय पर्यावरणावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी, सामाजिक जबाबदारी उपक्रम आणखी बळकट करण्यासाठी आणि आमच्या प्रशासकीय पद्धती सुधारण्यासाठी धाडसी पावले उचलणार आहोत. आम्हाला अभिमान वाटतो, की डाउ जोन्स सस्टेनिबिलीटी इंडेक्सने याची दखल घेतली आहे. या उद्योगासाठी नवा मार्ग तयार करण्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. २०२४ कार्बन- न्यूट्रलच्या उद्दिष्टाचा काळ जवळ येत असताना शाश्वत उपक्रमांची प्रगती करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.
कंपनीची शाश्वततेप्रती असलेली बांधिलकी दर्शवणाऱ्या शाश्वत मिठास हा शाश्वत साखर उपक्रमाअंतर्गत पुढील वर्षात ऊस शेतकऱ्यांसाठी शाश्वत उपाययोजना पुरवण्याचे ध्येय आहे. आम्ही कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात येथील १५ साखर कारखान्यांसह सामंजस्य करार करण्याचे नियोजन करत आहोत. त्याशिवाय ‘खाद्यपदार्थ सुरक्षा’ उपक्रमाअंतर्गत विकसनशील जगातील खाद्य उत्पादन, स्टोअरेज व पुरवठा साखळीला चालना देण्यासाठी जागतिक पातळीवर आघाडीवर असलेल्या कंपन्यांसह आम्ही करार केला आहे.
प्रत्येक वर्षात बदलत्या हवामानाची अनिश्चितता व त्याचा संभाव्य परिणाम लक्षात घेता आपण सतर्क राहाणे अतिशय महत्त्वाचे झाले आहे. म्हणूनच अत्याधुनिक तंत्रज्ञानाप्रती बांधील राहाणे आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी अचूक शेती पद्धतींचा अवलंब करणे व जागतिक खाद्य सुरक्षेची खात्री करणे आवश्यक झाले आहे. तंत्रज्ञानाचा समावेश केल्यामुळे उत्पादनक्षमता वाढेलच, शिवाय शाश्वततेला चालना मिळेल. त्यामुळे जागतिक स्तरावरील शेती क्षेत्राचा विकास वाढण्यास मदत होईल. यापुढील काळात जागतिक स्तरावर शाश्वत शेतीला मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल अशी आमची अपेक्षा आहे.
आशिष दोभाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, युपीएल एसएएस
हिंदुस्थान समाचार
