cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Business > पुढील आठवड्यात सात नवीन आयपीओ होणार खुले; चार कंपन्यांची लिस्टिंग
Business

पुढील आठवड्यात सात नवीन आयपीओ होणार खुले; चार कंपन्यांची लिस्टिंग

CliQ INDIA
Last updated: March 23, 2026 6:32 am
CliQ INDIA
Share
4 Min Read
SHARE

नवी दिल्ली, 22 मार्च (हिं.स.)। उद्या सोमवार (२३ मार्च) पासून सुरू होणाऱ्या आठवड्यात प्राथमिक बाजारपेठेत मोठी हालचाल पाहायला मिळणार आहे. या आठवड्यात एकूण सात कंपन्या आपले आयपीओ लॉन्च करणार आहेत. यामध्ये तीन आयपीओ मेनबोर्ड सेगमेंटमधील असून चार आयपीओ एसएमई सेगमेंटमधील आहेत. याशिवाय, मागील आठवड्यात उघडलेल्या दोन आयपीओमध्येही या आठवड्यात २४ मार्चपर्यंत गुंतवणूकदारांना बोली लावण्याची संधी उपलब्ध असेल. तसेच, या आठवड्यात चार कंपन्यांची शेअर बाजारात लिस्टिंग होणार आहे, त्यापैकी तीन कंपन्या मेनबोर्ड सेगमेंटमधील आहेत.

आठवड्याच्या पहिल्या दिवशी, म्हणजे २३ मार्च रोजी, टिपको इंजिनिअरिंगचा ६०.५५ कोटी रुपयांचा आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल. या इश्यूमध्ये २५ मार्चपर्यंत गुंतवणूक करता येईल. प्रति शेअर किंमत पट्टा ८४ ते ८९ रुपये ठेवण्यात आला आहे, तर लॉट साईज १,६०० शेअर्सचा आहे. आयपीओ बंद झाल्यानंतर १ एप्रिल रोजी कंपनीचे शेअर्स बीएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर लिस्ट होण्याची शक्यता आहे.

यानंतर २४ मार्च रोजी साई पैरेंटेरल्सचा ४०८.७९ कोटी रुपयांचा आयपीओ खुला होईल. या इश्यूमध्ये २७ मार्चपर्यंत बोली लावता येईल. प्रति शेअर किंमत पट्टा ३७२ ते ३९२ रुपये असून लॉट साईज ३८ शेअर्सचा आहे. या आयपीओची लिस्टिंग २ एप्रिल रोजी बीएसई आणि एनएसईवर होऊ शकते.

याच दिवशी अमीर चंद जगदीश कुमार कंपनीचा ४४० कोटी रुपयांचा आयपीओही खुला होईल. या इश्यूमध्येही २७ मार्चपर्यंत बोली लावता येईल. किंमत पट्टा २०१ ते २१२ रुपये प्रति शेअर असून लॉट साईज ७० शेअर्सचा आहे. या कंपनीची लिस्टिंग २ एप्रिल रोजी बीएसई आणि एनएसईवर अपेक्षित आहे.

तसेच, पावरिका लिमिटेडचा १,१०० कोटी रुपयांचा मोठा आयपीओही २४ मार्च रोजीच खुला होईल. या इश्यूमध्ये २७ मार्चपर्यंत गुंतवणूक करता येईल. प्रति शेअर किंमत पट्टा ३७५ ते ३९५ रुपये असून लॉट साईज ३७ शेअर्सचा आहे. या कंपनीचे शेअर्स २ एप्रिल रोजी बीएसई आणि एनएसईवर लिस्ट होण्याची शक्यता आहे.

याच दिवशी हाईनेस मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचा २१.६७ कोटी रुपयांचा एसएमई आयपीओही खुला होईल. या इश्यूमध्ये २७ मार्चपर्यंत बोली लावता येईल. प्रति शेअर किंमत पट्टा ११२ ते ११४ रुपये असून लॉट साईज १,२०० शेअर्सचा आहे. लिस्टिंग २ एप्रिल रोजी बीएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर होण्याची शक्यता आहे.

२५ मार्च रोजी विविड इलेक्ट्रोमेकचा १३०.५४ कोटी रुपयांचा आयपीओ खुला होईल. या इश्यूमध्ये ३० मार्चपर्यंत गुंतवणूक करता येईल. प्रति शेअर किंमत पट्टा ५२८ ते ५५५ रुपये असून लॉट साईज २४० शेअर्सचा आहे. या कंपनीची लिस्टिंग ६ एप्रिल रोजी एनएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर अपेक्षित आहे.

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी, २७ मार्च रोजी एमिएक टेक्नोलॉजीजचा आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल. या इश्यूमध्ये ८ एप्रिलपर्यंत बोली लावता येईल. मात्र, या आयपीओसाठी किंमत पट्टा आणि लॉट साईज अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत. कंपनीचे शेअर्स १३ एप्रिल रोजी बीएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर लिस्ट होण्याची शक्यता आहे.

या नवीन आयपीओंसोबतच, मागील आठवड्यात खुले झालेले दोन आयपीओ अजूनही गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहेत. स्पेशियलिटी मेडिसिन्सचा २९.१४ कोटी रुपयांचा आयपीओ २४ मार्चपर्यंत खुला राहणार आहे. यासाठी किंमत पट्टा ११७ ते १२४ रुपये असून लॉट साईज १,००० शेअर्सचा आहे. या आयपीओला आतापर्यंत ८४ टक्के सबस्क्रिप्शन मिळाले असून, लिस्टिंग ३० मार्च रोजी बीएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर अपेक्षित आहे.

तसेच, सेंट्रल माइन प्लानिंग अँड डिझाइन इन्स्टिट्यूट लिमिटेड (CMPDIL) चा १,८४२.१२ कोटी रुपयांचा आयपीओ देखील २४ मार्चपर्यंत खुला आहे. यासाठी किंमत पट्टा १६३ ते १७२ रुपये असून लॉट साईज ८० शेअर्सचा आहे. या आयपीओला आतापर्यंत केवळ ७ टक्के सबस्क्रिप्शन मिळाले आहे. कंपनीचे शेअर्स ३० मार्च रोजी बीएसई आणि एनएसईवर लिस्ट होण्याची शक्यता आहे.

शेअर बाजारातील लिस्टिंगच्या दृष्टीने, २३ मार्च रोजी इनोविजन कंपनीचे शेअर्स बीएसई आणि एनएसईवर लिस्ट होऊ शकतात. २४ मार्च रोजी जीएसपी क्रॉप सायन्सेस आणि राजमार्ग इन्फ्रा इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट या कंपन्यांची लिस्टिंग अपेक्षित आहे. तसेच, २५ मार्च रोजी नोवस लॉयल्टीचे शेअर्स बीएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर लिस्ट होऊ शकतात.

—————

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule

You Might Also Like

सब्सक्रिप्शनसाठी शॅडोफॅक्सचा आयपीओ खुला; 22 जानेवारीपर्यंत लावता येणार बोली
ओपनएआयचे नवीन ‘जीपीटी ५.४’ मॉडेल लाँच
चांदी एक हजाराने स्वस्त; सोनेही घटले
मेटाने पाच नव्या भारतीय भाषांचा सपोर्ट केला जाहीर
सेन्सेक्स १,१२२ अंकांनी तर निफ्टी ३८५ अंकांनी कोसळला

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article १ कोटींची बनावट दारू पकडली; नेरळ पोलिसांची तस्करांवर कारवाई
Next Article पुण्यातील टेकड्यांच्या परिसरात ऑपरेशन वुल्फ डॉग मोहीम
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?