cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Business > क्रेडाई प्रॉपर्टी एक्सपो प्रदर्शनाचा 26 रोजी शुभारंभ
Business

क्रेडाई प्रॉपर्टी एक्सपो प्रदर्शनाचा 26 रोजी शुभारंभ

CliQ INDIA
Last updated: October 25, 2023 8:30 pm
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE

नाशिक, २५ ऑक्टोबर, (हिं.स) – आपल्या घरकुलाची स्वप्नपूर्ती व चांगला परतावा देणाऱ्या रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीच्या संधी येत्या 26 ते 30 ऑक्टोबर दरम्यान क्रेडाई नाशिक मेट्रोच्या प्रॉपर्टी एक्स्पो या गृहप्रदर्शनाच्या निमित्ताने ठक्कर डोम येथे एकच छताखाली मिळणार असून या प्रदर्शनाचा शुभारंभ 26 रोजी सकाळी 10 वाजता होत असल्याची माहिती क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील यांनी दिली.

क्रेडाई प्रॉपर्टी एक्सपो हे उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे गृह प्रदर्शन असून मनासारखे बजेट , आवश्यक सर्व सोयी सुविधा आणि मनासारखे लोकेशन या त्रिसूत्री च्या शोधात असणाऱ्यां साठी हे प्रदर्शन म्हणजे एक नामी संधी आहे.

क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या प्रॉपर्टी एक्सपोची असंख्यजण आतुरतेने वाट बघत असतात असे नमूद करून कृणाल पाटील म्हणाले की आपले घर घेणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. अशातच नाशिक प्रगतीच्या व उत्तम कनेक्टिव्हिटी च्या दिशेने अग्रेसर आहे. नाशिक च्या विकासाला चालना देणारे अनेक प्रकल्प पूर्ण झाले असून अनेक प्रकल्प नजीकच्या काळात पूर्ण होतील .या मध्ये समृद्धी महामार्ग, चेन्नई – सुरत महामार्ग, ड्राय पोर्ट, दिंडोरी येथील 300 एकर विस्तारलेला रिलायन्स प्रकल्प, लॉजिस्टिक्स पार्क,आय टी हब आदी काही प्रमुख आहे.

त्यामुळे घर व जागेतील आजची गुंतवणूक ही भविष्यात उत्तम परतावा देणार हे नक्की असेही ते म्हणाले .

प्रॉपर्टी एक्सपो 2023 चे समन्वयक म्हणून अंजन भलोदिया तर सहसमन्वयक म्हणून ऋषिकेश कोते व नितीन पाटील हे जबाबदारी सांभाळत आहेत.

प्रॉपर्टी एक्सपो बाबत अधिक माहिती देताना समन्वयक अंजन भलोदिया म्हणाले की, या 4 दिवसीय एक्सपोमध्ये 80 हून अधिक विकसकांचा सहभाग असून 300 हून अधिक पर्याय उपलब्ध राहणार आहेत. फ्लॅट, प्लॉट, रो हाऊस, दुकाने, ऑफिसेस, फार्म हाऊस अशा विविध पर्यायातून ग्राहकाला निवड करणे सोपे जाईल.या एक्सपो मध्ये एकाच छताखाली असंख्य पर्याय उपलब्ध असल्याने नाशिक सहित धुळे, जळगाव, अहमदनगर, ठाणे, नवी मुंबई येथून देखील असंख्य नागरिक प्रदर्शनास भेट देण्यासाठी येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सहसमन्वयक ऋषिकेश कोते म्हणाले की, एकच भेट प्रॉपर्टी चा निर्णय थेट या थीम वर आधारित हे प्रदर्शन सध्याची ऑक्टोबर हिट लक्षात घेऊन पूर्ण वातानुकूलित करण्यात आले असून विशिष्ट रचनेमुळे प्रदर्शन बघण्याची वेगळीच अनुभूती मिळणार आहे.

सहसमन्वयक नितीन पाटील यांनी सांगितले की, प्रदर्शनाचा कालावधी हा दसरा ते दिवाळी दरम्यानचा असून या सणासुदीच्या निमित्ताने असंख्य जण आपल्या नूतन वास्तू घेण्याच्या स्वप्नाचे नियोजन करीत असतात. आघाडीच्या गृह कर्ज पुरवणाऱ्या संस्थांचा सहभाग देखील प्रदर्शनात राहील असेही त्यांनी नमूद केले.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

बर्गर किंग इंडियाचे व्हॉपर : स्वाद ऐसा, इंडिया जैसा कॅम्पेन सुरू
सीताराम जिंदाल यांचा पद्मभूषण पुरस्काराने सन्मान
देशात सोन्या- चांदीचे दर घसरले
जीएसटी चुकवल्याबद्दल ब्रिटानिया इंडस्ट्रीजला ४.२४ कोटी रुपयांचा दंड
गोदरेज प्रॉपर्टीजच्या तिस-या तिमाहीचे एकत्रित वित्तीय निकालांची घोषणा

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article नागपूर : विविध घटनांमध्ये दोघांची हत्या
Next Article पुणे : अमोल मिटकरी यांनी माफी मागावी- भाजप
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?