मुंबई, 20 ऑगस्ट (हिं.स.)। भारत सरकारने एमएसएमई वित्तपुरवठा करण्यावर दिलेला जोर पाहता इंडियन बँकेने सुद्धा एमएसएमई वित्तपुरवठा करण्यावर अधिक जोर द्यायचे ठरवले आहे. ह्याच मालिकेत इंडियन बँकेने एमएसएमई आणि रिटेल ग्राहक संपर्क शिबिराचं मुंबईत आयोजन केले होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बँकेचे एमडी आणि सीईओ बिनोद कुमार यांनी भूषवले. शिबिरामध्ये संपूर्ण एफजीएम क्षेत्रातील एमएसएमई आणि रिटेल ग्राहकांना 1400 करोड रुपयांपर्यंतची एकंदरीत 200 ऋणे मंजूर केली गेली आणि ऋण मंजूरीपत्रे वितरित केली गेली.
ग्राहकांना संबोधताना विनोद कुमार यांनी एमएसएमई आणि रिटेल क्षेत्रातील बँकेच्या विविध उत्पादनांची आणि योजनांची संक्षिप्त माहिती दिली. या व्यतिरिक्त ग्राहकांना बँकेच्या एमएसएमई आणि रिटेल तसेच डिजिटल उत्पादनांची ओळख व्हावी यासाठी ऑडिओ-व्हिज्युअल सादरीकरण केले गेले.
एमडी आणि सीईओ यांनी पुढे असेही सांगितले कि इंडियन बँकेने पुढाकार घेऊन नवीन वेगवेगळ्या सेवांचा प्रारम्भ केला आहे जसे इंड स्मार्ट बिझ ऐप ,फोरेक्ससाठी इंड ट्रेड नेक्स्ट ,1 करोड रुपयांपर्यंत इंड जीएसटी अंतर्गत त्रासमुक्त कर्ज, एमएसएमई खात्यांची ऑनलाइन रिव्ह्यू व नवीकरण इत्यादि.
बँकेने विशेष एमएसएमई राईज अभियान सुरू केले आहे ज्यायोगे कमी आरओई,विविध सवलती इत्यादी विशेष लाभ उपलब्ध केले गेले आहेत.
या कार्यक्रमाला मुंबईचे क्षेत्र महाव्यवस्थापक दीपक गुप्ता ही उपस्थित होते.
—————
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule
