cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Article > अष्टावधान कला – एकाग्रतेचा आणि सर्जनशीलतेचा आविष्कार
Article

अष्टावधान कला – एकाग्रतेचा आणि सर्जनशीलतेचा आविष्कार

CliQ INDIA
Last updated: August 12, 2025 6:38 am
CliQ INDIA
Share
8 Min Read
SHARE

संस्कृतभारती या संस्कृतचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या संस्थेने रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे रत्नागिरी उपकेंद्र, स्वानंद पठण मंडळ, विविध विद्यालये अशा विविध संस्थांच्या सहकार्याने रत्नागिरीमध्ये संस्कृत सप्ताहाचे आयोजन केले आहे. या सप्ताहाची सांगता मंगळवार, दि. १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ ते ७ या वेळामध्ये माधवराव मुळे भवनामधील वैद्य सभागृहामध्ये “अष्टावधान कलेच्या सादरीकरणाने” होणार आहे. त्यानिमित्त अष्टावधान कलेची प्राथमिक ओळख करून देणारा लेख.

………..

भारतीय शिक्षण परंपरेमध्ये अष्टावधान कला ही एक वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. जुन्या काळातल्या मौखिक परंपरांपैकी ही एक मौखिक परंपरा आहे. याबद्दलची माहिती प्रामुख्याने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अशा प्रकारे प्रवाहित झाली आहे. ही कला प्राधान्याने दक्षिण भारतात अधिक प्रमाणात रूढ असलेली दिसते. गेल्या काही वर्षांतील या कलेची नोंद माध्यमांमधून घेतली गेली आहे.

गेली अनेक दशके शाळा-महाविद्यालयांमधून भाषेचा जो अभ्यास होतो तो प्राधान्याने लेखी स्वरूपात होतो. मौखिक अथवा वाचिक अभ्यासावर त्या मानाने कमी भर दिला गेलेला आहे. परंतु आपल्या प्राचीन परंपरेमध्ये मौखिक अभ्यासाला महत्त्वाचे स्थान होते, असे दिसते. भाषेच्या अभ्यासासाठी मौखिक अभ्यास ही खरे तर अपरिहार्य गोष्ट असायला हवी. तीच या परंपरेमध्ये आपल्याला दिसते. अष्टावधान कला भाषेच्या विविधांगी अभ्यासाचा हा एक उत्तम आविष्कार आहे.

अष्टावधान या शब्दामध्ये दोन शब्द आहेत, अष्ट आणि अवधान. अष्ट म्हणजे आठ आणि अवधान म्हणजे विशिष्ट ठिकाणी लक्ष असणे. एकाग्रता हाही शब्द यासाठी वापरतात. मराठीमध्ये आपल्या परिचयाचा असलेल्या सावधान या शब्दामध्ये अवधान हा शब्द आलेला आहेच. अवधान हा शब्दही मराठीमध्ये वापरला जातोच. आठ गोष्टींचे अवधान ज्या कलेमध्ये दर्शविले जाते, ती कला म्हणजे अष्टावधान कला अशी त्याची एक सामान्य व्याख्या करता येईल.

या कलेमध्ये जी मुख्य व्यक्ती आहे तिला अवधानी असे म्हटले जाते. ही व्यक्ती विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देते. या व्यक्तीकडे भाषाप्रभुत्व, उत्तम धारणाशक्ती, स्मरणशक्ती, काव्यरचनेचे सामर्थ्य आणि प्रत्युत्न्नमतित्व म्हणजेच हजरजबाबीपणा असावा लागतो. या व्यक्तीला प्रश्न किंवा माहिती विचारणाऱ्या व्यक्तीला प्रच्छक असे म्हणतात. जेव्हा ८ प्रच्छक असतात तेव्हा त्याला अष्टावधान असे म्हटले जाते. १० प्रच्छक असतील तर दशावधान, १०० प्रच्छक असतील तर शतावधान तसेच अन्य प्रच्छक संख्येनुसार प्रकार आहेत. अगदी अंतिम म्हणता येईल असा सहस्रावधान हाही प्रकार आहे. हे जसे संख्येवर आधारित प्रकार आहेत, तसेच आशयावर आधारित साहित्यावधान आणि धारणावधान हे अवधानाचे दोन प्रकार मानले जातात. साहित्यावर आधारित असेल तर त्याला साहित्यावधान म्हटले जाते आणि धारणाशक्तीवर आधारित असेल तर त्याला धारणावधान म्हटले जाते.

अवधानी व्यक्तीला काय विचारायचे याचेही अनेक प्रकार आहेत. यामध्ये काही प्रकार हे तिथल्या तिथे संस्कृतमध्ये काव्यरचना करण्यासाठी विचारले जातात आणि काही प्रकार धारणाशक्तीवर आधारित असतात. या कलेच्या सादरीकरणामध्ये अवधानी व्यक्ती मध्यभागी बसते आणि त्याच्या दोन बाजूंना समान संख्येने प्रच्छक बसतात. यामध्ये चार आवर्तने अर्थात फेऱ्या असतात. काव्यरचना ही साधारणतः चार चरणांची असते. प्रत्येक आवर्तनामध्ये एक चरण रचले जाते आणि चौथ्या आवर्तनानंतर पूर्ण काव्य सादर होते. काव्यरचना सोडून अन्य विषयांवर प्रश्न विचारले जातात किंवा संवाद साधला जातो.

रत्नागिरीत होणाऱ्या अष्टावधानकलेच्या पार्श्वभूमीवर त्यामध्ये सादर होणाऱ्या प्रश्नांच्या प्रकारांची संक्षिप्त माहिती या लेखात देत आहे.

प्रथम काव्यरचनेचे विषय सांगत आहे.

१. निषिद्धाक्षरी – या प्रकारामध्ये प्रच्छक काव्य करण्यासाठी विषय देतात आणि काव्य करताना विशिष्ट अक्षर वापरू नये, असे सांगतात. उदाहरणार्थ गणपती हा विषय वर्णन करण्यासाठी दिलेला आहे आणि ग हे अक्षर वापरू नये असे सांगितले जाते. त्यावेळी गणेशासाठी ग नसलेले शब्द म्हणजेच वक्रतुंड, लंबोदर अशा प्रकारचे शब्द वापरून काव्य करणे अपेक्षित असते.

२. समस्यापूर्ती – यामध्ये एक चरण दिला जातो. तो चरण काहीतरी विचित्र अर्थाचा किंवा संगती नसलेला असतो. उदाहरणार्थ ‘रात्रौ रवि: राजते ।’ याचा अर्थ रात्री सूर्य शोभून दिसतो. असा चरण दिल्यानंतर त्याला सुसंगत होईल अशी काव्यरचना या प्रकारात अपेक्षित असते. संस्कृत शिकलेल्यांनी अभ्यासक्रमात कुठे ना कुठे समस्यापूर्तीचे श्लोक अभ्यासलेले असतात. समस्यापूर्तीचे अनेकांना माहीत असलेले उदाहरण म्हणजे ‘तक्रं शक्रस्य दुर्लभम्’ इंद्रासाठी ताक दुर्लभ आहे. आता अमृतपान करणाऱ्या इंद्राला ताकाचे काय महत्त्व असणार? परंतु ही समस्या पुढीलप्रमाणे सोडवलेली आहे. ‘भोजनान्ते च किं पेयं जयन्तः कस्य वै सुतः। कथं विष्णुपदं प्रोक्तं तक्रं शक्रस्य दुर्लभम् ।।’ विसंगतीतही सुसंगती साधण्याचे कौशल्य यामध्ये दिसते.

३. दत्तपदी – या प्रकारामध्ये विशिष्ट शब्द दिले जातात. हे शब्द कोणत्याही प्रकारचे अगदी अन्य भाषेमधीलही असू शकतात. उदाहरणार्थ खाना, पीना, सोना, गाना इत्यादी. असे दिलेले शब्द संस्कृत काव्यरचनेमध्ये गुंफून अवधानी काव्य सादर करतात.

४. आशुकाव्य – यासाठी मराठीमध्ये प्रचलित असलेला शब्द आहे शीघ्र काव्य. यामध्ये विषय आणि छंद किंवा वृत्त सांगितले जाते. त्या विषयावर आणि त्याच वृत्तामध्ये अवधानी प्रत्येक आवर्तनामध्ये एक एक पद्य रचना करतात. याप्रकारे एकूण ४ पद्यरचना सादर केल्या जातात.

५. चित्रकाव्य – साहित्यरचनेमध्ये पद्मबन्ध, मुरजबन्ध, हारबन्ध, पुष्पगुच्छबन्ध अशा विविध प्रकारचे काव्यबंध सांगितलेले आहेत. पूजनीय टेंबे स्वामींनी अशा प्रकारची काव्यरचना केलेली काही जणांना माहिती असेल. या वैचित्र्यपूर्ण बंधामध्ये काव्यरचना केली जाते आणि फलकावर त्या बंधाच्या आकृतीसह ते लिहून प्रेक्षकांना दाखविले जाते.

काव्यरचना सोडून धारणा शक्तीवर आधारित असलेल्या अशा तीन प्रकारांचा परिचय आता करून घेऊ या.

६. काव्यवाचन – यामध्ये संस्कृत साहित्यातील श्लोकांचे गायन केले जाते. तो श्लोक कोणत्या ग्रंथातील आहे, कोणत्या वृत्तातील आहे तसेच संदर्भ अशी माहिती अवधानी प्रस्तुत करतात.

७. संख्याबंध – यामध्ये ५x५ असा तक्ता फलकावर काढलेला असतो. प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीने प्रथम एक संख्या सांगावयाची असते. त्यानंतर विशिष्ट रकान्यातील संख्या विचारावयाची असते. त्यातील संख्या अवधानी सांगतात आणि शेवटी त्या सर्व रकान्यांची उभी, आडवी, तिरकी कशाही प्रकारे बेरीज केली तर प्रथम दिलेली संख्या हीच बेरीज म्हणून येते.

8. अप्रस्तुतप्रसंग – अष्टावधानातील हा प्रकार एकूणच सादरीकरणातील रंजकतेसाठी आणि विनोद निर्मितीसाठी अपेक्षित आहे. यामध्ये प्रच्छक अवधानी व्यक्तीला विचलित करण्याच्या दृष्टीने काही प्रश्न विचारतात किंवा मध्येच त्यावर स्वतःचे प्रश्न विचारतात. कधी कधी चाललेल्या विषयापासून दूर नेण्यासाठी विषयांतर करतात. अवधानी व्यक्तीच्या एकाग्रतेची कसोटी पाहण्याचा हा एक प्रकार आहे, असे म्हणता येईल.

याखेरीजही अनेक प्रकार आहेत. परंतु रत्नागिरीत होणाऱ्या अष्टावधान कलेची तोंडओळख व्हावी म्हणून हे प्रकारे येथे सांगितले आहेत. खरे तर याचा अनुभव घेतल्यानंतर या अष्टावधान कलेची खरी ओळख होईल असे वाटते. सध्या संस्कृत भाषेमध्ये हा प्रयोग होत असला तरी हा प्रयोग विविध भाषांच्या अभ्यासकांनासुद्धा करता येईल असा आहे. हे एक तंत्र आहे, ते आत्मसात केल्यानंतर कोणत्याही भाषेसाठी वापरता येईल.

रत्नागिरीमध्ये होणाऱ्या अष्टावधानामध्ये कर्नाटकातील बंगळुरू येथे वास्तव्य असलेले डॉ. उमामहेश्वर अवधानी आहेत. शृंगेरी येथील केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले असून आतापर्यंत त्यांनी ३० ठिकाणी अष्टावधान सादर केले आहे. प्रच्छक म्हणून गोवा, मुंबई आणि रत्नागिरी येथील महाबलभट्ट, डॉ. दिनकर मराठे, डॉ. कल्पना आठल्ये, सौ योगिता केळकर, कु. मयूरी जोशी, चैतन्य पाडळकर राजेश कुमार आणि कु. मैत्रेयी आमशेकर सहभागी होणार आहेत.

– डॉ. कल्पना आठल्ये, रत्नागिरी

संस्कृत भारती, कोकण प्रांताध्यक्ष

—————

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी

You Might Also Like

महाराष्ट्राच्या गौरवात भर : 12 पराक्रम स्थळे युनेस्कोच्या व्यासपीठावर !
अयोध्येचा कायापालट : अध्यात्मिक प्रवास आधुनिक संपर्क सुविधेसह झेप
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-2025 : मार्गदर्शक सूचना जारी
स्वरांच्या सेतूवरून 'रामराज्याकडे': युवा पिढी आणि संगीताचा 'अंतर्नाद'
श्रीराम : कुशल संघटनाचा आदर्श!

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article उपचारासाठी आसाराम बापूंच्या अंतरिम जामिनात 29 ऑगस्टपर्यंत वाढ
Next Article हार्दिक पंड्याची आशिया कपसाठी फिटनेस टेस्ट होणार
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?